ETV Bharat / state

पुण्यात टिकटॉक वरुन साकारला 'आळंदी पॅटर्न'; 6 जणांना अटक

'मुळशी पॅटर्न' चित्रपटात जे घडले तेच या टिकटॉक व्हिडीओमध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे. 'तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या; म्हटल्यावर, आम्ही तुम्हाला खाणारच ना?' हा या चित्रपटातील फेमस डायलॉग आहे. त्याच डायलॉगचा वापर करणारे हे अल्पवयीन मुले देवाच्या आळंदीत 'आळंदी पॅटर्न' साकारण्याच्या तयारीत आहेत.

Alandi police station, pune
आळंदी पोलीस स्टेशन, पुणे
author img

By

Published : Dec 21, 2019, 9:10 PM IST

Updated : Dec 22, 2019, 2:46 PM IST

पुणे - शहरात तलवारी आणि कोयते नाचवत 'मुळशी पॅटर्न' चा थरार चित्रपटाच्या माध्यमातून रंगला. मात्र, आता 'मुळशी पॅटर्न' च्या आधारावर देवाच्या आळंदीत 'आळंदी पॅटर्न' सुरू झाल्याचे पहावयास येत आहे. तलवारी, कोयत्यांचा वापर करून टिकटॉकच्या माध्यमातून सध्याची अल्पवयीन मुले व्हिडिओ तयार करत आहे. या तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यात टिकटॉक वरुन साकारला 'आळंदी पॅटर्न

'मुळशी पॅटर्न' चित्रपटात काय आहे?

मुळशी पॅटर्न चित्रपटात जे घडले तेच या टिकटॉक व्हिडीओमध्ये चित्रीकरण करण्यात आले आहे. 'तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या; म्हटल्यावर, आम्ही तुम्हाला खाणारच ना?' हा या चित्रपटातील फेमस डायलॉग आहे. त्याच डायलॉगचा वापर करणारे हे अल्पवयीन तरुण देवाच्या आळंदीत 'आळंदी पॅटर्न' साकारण्याच्या तयारीत आहेत. आधी आयटी पार्क, इंडस्ट्रीसाठी जमिनी गेल्या. यातून भाईगिरीचा उदय झाला, हफ्तेखोरी, खंडणी सुरू झाली. एका भाईला संपवून दुसऱ्या भाईचा उदय झाला. नंतर त्याचाही कसा अंत झाला हे मुळशी पॅटर्नमध्ये दाखवले आहे. याचे चित्रीकरण पुण्याच्या मार्केटयार्ड आणि मुळशी भागात झाले आहे.

याचाच आधार घेऊन 'आळंदी पॅटर्न' मध्ये आळंदीमधील बाजारपेठ, इंद्रायणी घाट आणि अर्धवट बांधकामांचा आधार घेण्यात आला. 55 सेकंदाची ही व्हिडिओ क्लिप आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी नगरीत वारकरी घडवले जातात. मात्र, आता याच वारकऱ्यांच्या आळंदीत "टिक टॉक" च्या माध्यमातून तरुणाई गुन्हेगारीच्या दिशेने वाटचाल करताना दिसते आहे. एकंदरीत यातून सूडाची भावना निर्माण करणारे व्हिडिओ "टिक टॉक" च्या माध्यमातून व्हायरल होऊ लागले आहे. पोलिसांनी 'आळंदी पॅटर्न' साकारण्याच्या तयारीत असणाऱ्या 6 तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यातील तिघे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.

हेही वाचा - 'मनात आणलं तर मंत्रिमंडळाचा विस्तार नवीन वर्षापूर्वी'

55 सेकंदाचा 'आळंदी पॅटर्न'....

दिवसा झालेल्या या चित्रीकरणात तलवारी अन् कोयते हे नाचवण्यात आल्यात. आळंदी पॅटर्नमध्ये 30 सेकंदानंतर इंटरवल आहे. उर्वरित भाग हा 25 सेकंदाचा आहे. या अवघ्या 55 सेकंदात 'आळंदी पॅटर्न' साकारण्यात आला. टिकटॉकचे हे 2 भाग परिसरात व्हायरल झाले आहेत.

हेही वाचा - भारत धर्मशाळा आहे का? नागरिकत्व कायद्यावरून राज ठाकरेंचा मोदी सरकारला प्रश्न

टिक टॉक व्हिडिओ करणाऱ्यांनो सावधान...!

सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करुन प्रसिद्धी मिळवण्याकडे युवकांचा कल वाढला आहे. मात्र, हे करत असताना किती महागात पडू शकता याचा प्रत्यय आळंदीतील युवकांना आला आहे. बऱ्याच वेळा व्हिडीओ तयार करताना शस्त्रांचं प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळते. मात्र, शस्त्रात्र कायद्याखाली हा गुन्हा आहे. त्यामुळे असे करण्याआधी 10 वेळा विचार करा हेच या निमित्ताने सांगावे लागेल.

Intro:Anc__पुण्यामध्ये नंग्या तलवारी आणि कोयते नाचवत "मुळशी पॅटर्न" चा थरात चित्रपटाच्या माध्यमातून रंगला मात्र आता "मुळशी पॅटर्न" च्या आधारावर देवाच्या आळंदीत "आळंदी पॅटर्न" सुरू झालाय नंग्या तलवारी, कोयत्यांचा वापर करून टिकटॉक च्या माध्यमातून सध्याची अल्पवयीन व्हिडिओ तयार करत आहे या तरुणांच्या आता पोलिसांनी मुसक्या आवळल्या

Vo_मुळशी चित्रपटात जे घडलं तेच या टिकटॉक व्हिडीओमध्ये चित्रीकरण केलं गेलंय. 'तुम्ही आमच्या जमिनी खाल्ल्या म्हटल्यावर, आम्ही तुम्हाला खाणारच ना?' हा या चित्रपटातील फेमस डायलॉग आहे. त्याच डायलॉगचा वापर करणारे हे अल्पवयीन तरुण देवाच्या आळंदीत 'आळंदी पॅटर्न' साकारण्याच्या तयारीत आहेत,

Vo_आधी आयटी पार्क, इंडस्ट्रीसाठी जमिनी गेल्या. यातून भाईगिरीचा उदय झाला, हफ्तेखोरी, खंडणी सुरू झाली. एका भाईला संपवून दुसऱ्या भाईचा उदय झाला अन् नंतर त्याचाही कसा अंत झाला हे मुळशी पॅटर्नमधुन आपण पाहिलं. याचं चित्रीकरण पुण्याच्या मार्केटयार्ड आणि मुळशी भागात झालं. त्यामुळे या 'आळंदी पॅटर्न' मध्ये आळंदीमधील बाजारपेठ,इंद्रायणी घाट आणि अर्धवट बांधकामांचा आधार घेण्यात आला.

Byte_रविद्र चोधर_पोलीस निरिक्षक आळंदी.

Vo_संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी नगरीत वारकरी घडवले जातात मात्र आता याच वारकऱ्यांच्या आळंदीत "टिक टॉक" च्या माध्यमातून तरुणाई गुन्हेगारीच्या दिशेने वाटचाल करते एकंदरीत यातून सूडाची भावना निर्माण करणारे व्हिडिओ "टिक टॉक" च्या माध्यमातून व्हायरल होऊ लागले त्यामुळे पोलिसांनी "आळंदी पॅटर्न" साकारण्याच्या तयारीत असणाऱ्या तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत

Vo_अवघ्या पंचावन्न सेकंदात अख्खा चित्रपटाचा थरार पाहून आळंदी पोलिसांना मोठा धक्का बसला. पोलिसांनी तपासाची सूत्र हलवली अन् नको ती किमया साधणाऱ्या या आळंदीतील तरुणांच्या अंगलट हे प्रकरण आलं. नव्याने स्टार म्हणुन उदयास येणा-या सहा स्टार्सना तुरुंगाची हवा खावी लागली पैकी तिघे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. तेव्हा उगवत्या स्टार्सनी टिकटॉकवर व्हिडीओ बनवताना काळजी घ्या, अन्यथा तुमची ही वर्हात थेट तुरुंगात जाईल.

55 सेकंदात 'आळंदी पॅटर्न'....
दिवसा झालेल्या या चित्रीकरणात नंग्या तलवारी अन कोयते हे नाचवण्यात आल्यात. आळंदी पॅटर्नमध्ये तीस सेकंदानंतर इंटरवल असून उर्वरित भाग हा पंचवीस सेकंदाचा आहे. या अवघ्या 55 सेकंदात 'आळंदी पॅटर्न' साकारण्यात आलाय. टिकटॉकचे हे दोन भाग परिसरात व्हायरल झाले.

टिक टॉक व्हिडिओ करणाऱ्यांनो सावधान!....
सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ तयार करुन प्रसिद्धी मिळवण्याकडे युवकांचा कल वाढला आहे. मात्र ते करत असताना ते किती महागात पडू शकता याचा प्रत्यय आळंदीतील युवकांना आला आहे. बऱ्याचवेळा व्हिडीओ तयार करताना शस्त्रांचं प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळतं. मात्र, शस्त्रात्र कायद्याखाली हा गुन्हा आहे. त्यामुळे असं करण्याआधी दहावेळा विचार करा हेच या निमित्ताने सांगावे लागेल.Body:Spl pkg करावं...Conclusion:
Last Updated : Dec 22, 2019, 2:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.