ETV Bharat / state

Pune Crime: पोलिसांच्या ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 577 गुन्हेगारांना अटक - 577 गुन्हेगारांना अटक

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अनेक परिसरात गाड्यांची तोडफोड तसेच अनेक परिसरात कोयत्याने दहशत पसरवली जात आहे. अश्या गुन्हेगारांवर आळा बसवण्यासाठी पुणे पोलिसांकडून ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आले. या दरम्यान जवळपास 1824 गुन्हेगारांना चेक करण्यात आले असून त्यापैकी 577 गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे.

Pune Crime
पुणे क्राईम
author img

By

Published : Jul 16, 2023, 5:28 PM IST

पुणे: शहरातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत ऑल आऊट कोम्बिंग ऑपरेशन राबविण्यात आले आहे. यासाठी पोलीस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार तसेच गुन्हे शाखेची पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी शहरातील वेगवगेळ्या परिसरात कोम्बिंग ऑपरेशन व तपासणी करून कारवाई केली. हॉटेल, लॉज, ढाबे, एस.टी व बस स्थानके, रेल्वे स्टेशन तसेच सार्वजनिक ठिकाणी आढळून येणारे संशयित व्यक्ती, घटना इत्यादींची कसून तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले होते. त्यानुसार या मोहीमेत तब्बल 1824 गुन्हेगारांना चेक करण्यात आले. त्यापैकी 577 गुन्हेगार मिळून आले आहेत.

13 आर्म अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल: विशेष मोहिमे दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये 13 आर्म अ‍ॅक्टचे गुन्हे दाखल करून 13 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 2 पिस्टल, 7 जिवंत काडतुसे तसेच 12 धारदार हत्यारे असा एकूण 85 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत केस दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे. तसेच प्रोव्हिबिशन नुसार सात केसेस दाखल करून 7630 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जुगार कायद्यानुसार तीन केसेस दाखल करून 3290 रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. परिमंडळ 5 मधील 4 पोलीस ठाण्यांतर्गत केलेली कारवाई प्रोव्हिबिशन अ‍ॅक्टनुसार दोन केसेस करुन दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून 1600 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध कारवाई: एनडीपीएस अ‍ॅक्टमध्ये एक कारवाई करण्यात आली असून आरोपीकडून 9500 रुपयांचे 3 ग्रॅम एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. परिमंडळ 4 मधील 7 पोलीस ठाण्यांतर्गत कारवाईत गुन्ह्यात निष्पन्न झालेले मात्र अटक नसलेल्या 11 आरोपींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत एक केस करून एका आरोपीला अटक केली आहे. तसेच प्रोव्हिबिशन नुसार 14 केसेस करून 9520 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच जुगार अ‍ॅक्टनुसार 11 केसेस करुन 33 आरोपींकडून 22 हजार 445 रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

एवढ्या रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त: परिमंडळ 1 मधील 6 पोलीस ठाण्यांतर्गत केलेल्या कारवाईमध्ये गुन्ह्यात निष्पन्न झालेले मात्र अटक नसलेल्या दोन आरोपींना अटक केली आहे. महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत एक केस करून एकाला अटक केली आहे. तसेच प्रोव्हिबिशन नुसार तीन केसेस दाखल करण्यात आल्या. यातील तीन आरोपींकडून 3350 रुपयांचा तसेच जुगार अ‍ॅक्ट नुसार दोघांवर केसेस करून त्यांच्याकडून 3300 रुपयांचा जुगाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा:

  1. Nagpur Crime News: मार्डच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह? महिला डॉक्टरचा 'तो' व्हिडीओ रेकॉर्ड करताना संशयित डॉक्टरला अटक
  2. Mumbai Crime : भाड्यावर घेतलेले 238 लॅपटॉप घेऊन पळालेल्या आरोपीला पकडले
  3. Bogus Income Tax Refund Claim Case : 263 कोटींच्या बोगस आयकर रिफंड क्लेम प्रकरणात अभिनेत्री कीर्ती वर्माचाही सहभाग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.