पुणे- दौंड तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड ही 9 व 10 फेब्रुवारी रोजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख प्रशासनाला दिले आहेत. या संबंधी परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गावात आपल्याच गटाचा सरपंच असावा यासाठी दौंड तालुक्यातील आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. गावागावात सरपंच कोण होणार याची उत्सुकता दिसून येत आहे .
सरपंच पदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी :
दौंड तालुक्यात ९ व १० फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्यात ही निवडणुक प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात पार पडणार आहे. या निवडणुकीत आपल्या गटाचा सरपंच व्हावा यासाठी गाव पुढारी तयारी करीत आहेत . पुरेसे सदस्य संख्याबळ सोबत नसतानाही अनेकांनी सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे . ग्रामपंचायत निवडणुकीसारखेच धक्कादायक निकाल सरपंच निवडीच्या वेळी लागण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील निवडणुक झालेल्या ५१ ग्रामपंचायतीची नावे पुढील प्रमाणे..
९ फेब्रुवारी - बिरोबाचीवाडी, हिंगणीबेर्डी, शिरापूर, लिंगाळी, नानविज, सोनवडी, कौठडी, रावणगाव, बोरीबेल खडकी, स्वामीचिंचोली, वरवंड, हिंगणीगाडा, कुसेगाव, हातवळण, पाटस, गलांडवाडी, बोरीपार्धी, यवत, ताम्हणवाडी, भरतगाव, सहजपूर, मिरवडी, पिंपळगाव, टाकळी, गोपाळवाडी. येथे सरपंच पदाची निवडणून घेण्यात येणार आहे.
१० फेब्रुवारी - वाळकी, आलेगाव, मळदपाटस, कडेठाण, देऊळगावगाडा, नानगाव, कासुर्डी, भांडगाव, खोर, कोरेगाव भिवर, उंडवडी, वडगाव दरेकर ,पेडगाव, गिरिम, खोरवडी ,खानोटा, नंदादेवी, राजेगाव, गार , कानगाव , खामगाव, खुटबाव , लडकतवाडी, पडवी आणि बोरीऎंदी या ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणुक होणार आहेत
दौंड तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीचे लक्ष सरपंच निवडीकडे - दौंड तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीचे लक्ष सरपंच निवडीकडे
आपल्या गटाचा सरपंच व्हावा यासाठी गाव पुढारी तयारी करीत आहेत . पुरेसे सदस्य संख्याबळ सोबत नसतानाही अनेकांनी सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे . ग्रामपंचायत निवडणुकीसारखेच धक्कादायक निकाल सरपंच निवडीच्या वेळी लागण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
पुणे- दौंड तालुक्यातील नुकत्याच पार पडलेल्या ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड ही 9 व 10 फेब्रुवारी रोजी घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख प्रशासनाला दिले आहेत. या संबंधी परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालानंतर गावात आपल्याच गटाचा सरपंच असावा यासाठी दौंड तालुक्यातील आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्या समर्थकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. गावागावात सरपंच कोण होणार याची उत्सुकता दिसून येत आहे .
सरपंच पदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी :
दौंड तालुक्यात ९ व १० फेब्रुवारी रोजी अशा दोन टप्यात ही निवडणुक प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात पार पडणार आहे. या निवडणुकीत आपल्या गटाचा सरपंच व्हावा यासाठी गाव पुढारी तयारी करीत आहेत . पुरेसे सदस्य संख्याबळ सोबत नसतानाही अनेकांनी सरपंच पदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे . ग्रामपंचायत निवडणुकीसारखेच धक्कादायक निकाल सरपंच निवडीच्या वेळी लागण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करीत आहेत.
तालुक्यातील निवडणुक झालेल्या ५१ ग्रामपंचायतीची नावे पुढील प्रमाणे..
९ फेब्रुवारी - बिरोबाचीवाडी, हिंगणीबेर्डी, शिरापूर, लिंगाळी, नानविज, सोनवडी, कौठडी, रावणगाव, बोरीबेल खडकी, स्वामीचिंचोली, वरवंड, हिंगणीगाडा, कुसेगाव, हातवळण, पाटस, गलांडवाडी, बोरीपार्धी, यवत, ताम्हणवाडी, भरतगाव, सहजपूर, मिरवडी, पिंपळगाव, टाकळी, गोपाळवाडी. येथे सरपंच पदाची निवडणून घेण्यात येणार आहे.
१० फेब्रुवारी - वाळकी, आलेगाव, मळदपाटस, कडेठाण, देऊळगावगाडा, नानगाव, कासुर्डी, भांडगाव, खोर, कोरेगाव भिवर, उंडवडी, वडगाव दरेकर ,पेडगाव, गिरिम, खोरवडी ,खानोटा, नंदादेवी, राजेगाव, गार , कानगाव , खामगाव, खुटबाव , लडकतवाडी, पडवी आणि बोरीऎंदी या ५१ ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच पदाची निवडणुक होणार आहेत
TAGGED:
daund_sarpanch_elections