ETV Bharat / state

Baramati Firing Case : बारामती गोळीबार प्रकरणातील 5 जणांना अटक

author img

By

Published : Nov 5, 2022, 10:46 PM IST

दोन दिवसांपूर्वी बारामती शहरात संध्याकाळी सातच्या सुमारास भिगवण रस्त्यावर झालेल्या गोळीबार (Baramati firing case) प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच जणांना ताब्यात घेत अटक (five accused arrested in Firing Case) केली आहे. latest news from Pune, Baramati Crime, Pune Crime

Baramati Firing Case accused arrest
बारामती गोळीबार प्रकरणातील 5 जणांना अटक

पुणे : दोन दिवसांपूर्वी बारामती शहरात संध्याकाळी सातच्या सुमारास भिगवण रस्त्यावर झालेल्या गोळीबार (Baramati firing case) प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पाच जणांना ताब्यात घेत अटक (five accused arrested in Firing Case) केली आहे. latest news from Pune, Baramati Crime, Pune Crime

बारामती गोळीबार प्रकरणातील आरोपींना अटक

हे आहेत अटकेतील आरोपी - या गोळीबार प्रकरणी शुभम विकास राजपुरे (वय २४, रा. मुर्टी-मोढवे, ता. बारामती), तुषार चंद्रकांत भोसले (वय २२ रा. रुईपाटी, बारामती), सूरज राजू काशिद (वय २७, रा. सावळ, ता. बारामती), तेजस रतीलाल कर्चे ( वय २१, रा. सूर्यनगरी, बारामती) व विक्रम लालासो बोबडे (वय २६, रा. रुई - सावळ, ता. बारामती) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपी सराईत गुन्हेगार- या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम राजपुरे याच्यावर गंभीर १३ गुन्हे दाखल आहेत. त्यात खूनाचा एक, खूनाच्या प्रयत्नाचा एक, दरोड्याचा एक जबरी चोरीचे दोन, खंडणीचा एक, अवैध शस्त्र बाळगण्याचे दोन, मारामारीचे दोन व चोरीचे तीन गुन्हे दाखल आहेत. तो भोसरी येथील खूनाच्या गुन्ह्यात २०२० मध्ये जेलमध्ये होता. तो सध्या रजेवर सुटला आहे.

जीवे मारण्यासाठी कोयत्याने वार - पर्वा भिगवन रस्त्यावर सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली होती. रिलायन्स पेट्रोल पंप येथे शुभम राजपुरे, तुषार भोसले यांनी सात ते आठ साथीदारांसह हातात कोयता घेऊन येत बारामतीचा मी बाप आहे, असे म्हणत ऋत्विक जीवन मुळीक, गणेश जाधव, अतुल भोलानकर यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने वार करून बंदुकीतून दोन गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेत जाधव याच्या पोटाच्या डाव्या बाजूला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला होता. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत ग्रामीण पोलिसांकडून या प्रकरणी 2 पथक तैनात करण्यात आले होते. यातील एका पथकाने तुषार भोसले, सूरज काशिद यांना पकडले. तर शुभम राजपुरे हा पिंपरी चिंचवड हद्दीत एका लॉजवर थांबला होता. तेथून राजपुरे याच्यासह कर्चे व बोबडे यांना ताब्यात घेण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.