पुणे : देशातील सर्वात जुनी व पहिली पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा ३६वे वर्ष साजरे करीत आहे. यंदा होणाऱ्या ‘नाईट मॅरेथॉन’चे रविवार 4 डिसेंबर 12 वाजता म्हणजे दि. ३ डिसेंबर रात्री १२ वाजता सारस बागेजवळील सणस मैदान येथे कारगिलच्या लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेचे चेअरमन चीफ एक्झिक्युटिव्ह काउंसिलर फिरोज अहमद खान यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात (36th Pune International Marathon) आला. सकाळी ८ वाजता या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ सणस मैदान येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते होईल.
लाखोंची बक्षिसे : याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण व अन्य प्रमुख पाहुणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. सर्व विजेत्यांना पुणे महानगरपालिके तर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली (Pune International Marathon) जातील. दरवर्षी प्रमाणे यंदा देखील विविध देशातील स्पर्धेक मॅराथॉन स्पर्धेत सहभागी झाले असून 42.195 किमी फुल मॅराथॉन स्पर्धेला रात्री 12 वाजता सुरुवात झाली. सणस मैदान चौक, सारस बाग, सिंहगड मार्ग, नांदेड सिटी, आतील सर्कलला वळसा घालून त्याचमार्गे सणस मैदान ही एक फेरी आणि अशीच दुसरी फेरी घेण्यात येणार आहे. तर महिला 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉन स्पर्धेला 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. त्याच मार्गाने एक फेरी पूर्ण करणार आहे. त्यानंतर सकाळी 6 वाजता 10 किमी, 6 वाजून 30 मिनिटांनी 5 किमी आणि 7 वाजता 3 किमी अशी स्पर्धा झाली आहे. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना पुणे महानगरपालिकेमार्फत 35 लाख रुपयांची बक्षिसे दिली जाणार (International Marathon on Sunday 4th December) आहे.
महिला व पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन : यंदाच्या या 80 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटू व १५००० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला (International Marathon in Pune) आहे. ४२.१९५ किमीची महिला व पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन सणस मैदान – सारस बाग – सिंहगड मार्ग – नांदेड सिटी – आतील सर्कलला वळसा घालून त्याचमार्गे सणस मैदान ही एक फेरी व अशी दुसरी फेरी अशी संपन्न झाली. या शिवाय याच मार्गावर एक फेरीची महिला व पुरुषांची अर्ध मॅरेथॉन ही रात्री १२.३० वाजता सुरु झाली. या शिवाय आज सकाळी ६ पासून १० किमी, ५ किमी, ३.५ किमी आणि व्हीलचेअर स्पर्धा आणि ‘रन फॉर हेल्थ’ ही थीम असलेली फॅमिली रन पार पडली. या स्पर्धेसाठी आवश्यक रायडर्स, डॉक्टर्स, नर्सेस, व्हॉलंटियर्स, पोलीस व ट्रॅफिक पोलीस, मार्गावरील स्पंजिंग सेंटर्स, मार्गावरील एलईडी बोर्ड्स, सणस मैदान येथे मिनी हॉस्पिटल अशी खास व्यवस्था करण्यात आली (Marathon on Sunday 4th December) होती.