पुणे : देशातील सर्वात जुनी आणि पहिली पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यंदा ३६वे वर्ष साजरी करत ( Pune International Marathon ) आहे. यंदा झालेल्या नाईट फुल मॅरेथॉनमध्ये इथोपियाच्या खेळाडूंनी बाजी मारली आहे. या 42.195 किमी फुल मॅराथॉन स्पर्धेत इथोपियाच्या लेटा तेस्फाये गुटेटा या खेळाडूने 2 तास 17 मिनिटे 27 सेकंदात येऊन बाजी मारली. त्यांनतर दुसऱ्या क्रमाकांवर इथोपियाच्या उर्गा केबुबे खेळाडूने 2 तास 18 मिनिटे 17 सेकंदात आला आहे. तर यीबेगता झेंगेटा या इथोपियाच्या खेळाडूने 2 तास 20 मिनिटे 23 सेकंदात येऊन तिसरा क्रमांक पटकावला ( 36th year International Marathon ) आहे.
सणस मैदानात बक्षीस वितरण समारंभ : पुण्यातील सारसबाग जवळील सणस मैदान येथे कारगिलच्या लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेचे चेअरमन / चीफ एक्झिक्युटिव्ह काउंसिलर फिरोज अहमद खान यांच्या शुभ हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नाईट मॅरेथॉन ला शुभारंभ करण्यात आले. विविध गटात रात्रभर झालेल्या या स्पर्धेनंतर सकाळी ८ वाजता या सर्व स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ सणस मैदान येथे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या शुभ हस्ते संपन्न ( Congress state president Nana Patole ) झाले. याप्रसंगी खा. वंदना चव्हाण, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, माजी उपमहापौर आबा बागुल व अन्य प्रमुख पाहुणे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. सर्व विजेत्यांना पुणे महानगरपालिके तर्फे ३५ लाख रुपयांची बक्षिसे दिली जातील.
विविध देशातील स्पर्धक सहभागी : दरवर्षी प्रमाणे यंदा देखील विविध देशातील स्पर्धक मॅराथॉन स्पर्धेत सहभागी झाले होते. 42.195 किमी फुल मॅराथॉन स्पर्धेला रात्री 12 वाजता सुरुवात झाली. सणस मैदान चौक, सारस बाग, सिंहगड मार्ग, नांदेड सिटी, आतील सर्कलला वळसा घालून त्याच मार्गे सणस मैदानही एक फेरी आणि अशीच दुसरी फेरी घेण्यात आली. महिला 21 किलोमीटर अर्ध मॅरेथॉन स्पर्धेला 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात झाली. त्याच मार्गाने एक फेरी पूर्ण करणार आहे. त्यानंतर सकाळी 6 वाजता 10 किमी, 6 वाजून 30 मिनिटांनी 5 किमी आणि 7 वाजता 3 किमी अशी स्पर्धा झाली आहे. या स्पर्धेतील सर्व विजेत्यांना पुणे महानगरपालिकेमार्फत 35 लाख रुपयांची बक्षिसे देण्यात आली.
45 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटू : यंदाच्या या मॅरेथॉनमध्ये 45 हून अधिक आंतरराष्ट्रीय धावपटू व १५,००० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. ४२.१९५ किमीची महिला व पुरुषांची पूर्ण मॅरेथॉन सणस मैदान – सारस बाग – सिंहगड मार्ग – नांदेड सिटी – आतील सर्कलला वळसा घालून त्याच मार्गे सणस मैदान ही एक फेरी व अशी दुसरी फेरी अशी संपन्न झाली. या शिवाय याच मार्गावर एक फेरीची महिला व पुरुषांची अर्ध मॅरेथॉन ही रात्री १२.३० वाजता सुरु झाली. या शिवाय सकाळी ६ पासून १० किमी, ५ किमी, ३.५ किमी आणि व्हीलचेअर स्पर्धा आणि ‘रन फॉर हेल्थ’ ही थीम असलेली फॅमिली रन पार पडली. या स्पर्धेसाठी आवश्यक रायडर्स, डॉक्टर्स, नर्सेस, व्हॉलंटियर्स, पोलीस व ट्रॅफिक पोलीस, मार्गावरील स्पंजिंग सेंटर्स, मार्गावरील एलईडी बोर्ड्स, सणस मैदान येथे मिनी हॉस्पिटल अशी खास व्यवस्था करण्यात आली होती.
भारतीय विजेत्यांचाही समावेश : ४२.१९५ किमीची महिला मुख्य मॅरेथॉन स्पर्धेमध्ये इथोपियाचे देरार्थू केबेडी या महिला स्पर्धकाने 2 तास 47 मिनिट 02 सेकंदात येऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर या स्पर्धेत पहिल्यांदाच या महिला मुख्य मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ज्योती गवाते यांनी 3 तास 10 मिनिटे 46 सेकंदात येऊन दुसरा क्रमांक पटकावला आहे. तर डिस्केट डोमणा यांनी 3 तास 26 मिनिट 18 सेकंदात येत तिसरा क्रमांक पटकावला आहे.