पुणे - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 7200 झाली आहे, तर जिल्ह्यात 3848 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 3037 आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 315 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून निरीक्षणाखाली आहेत. दुसरीकडे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8981 झाली आहे.
विभागातील 4423 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या 4147 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 411 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 197 रुग्ण गंभीर असून निरीक्षणाखाली आहेत. 28 मेच्या बाधित रुग्ण संख्येच्या तुलनेत विभागात बाधित रुग्णांच्या संख्येत 460ने वाढ झाली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात 321, सातारा जिल्ह्यात 30, सोलापूर जिल्ह्यात 100, तर कोल्हापूर जिल्ह्यात 09 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.