पुणे - रविवारी मिना नदीत पोहायला गेलेल्या ३ मुलांचे मृतदेह शोधण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले आहे. आज सकाळी एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर शोधमोहीम नव्याने सुरू करण्यात आली. नदीत शोध घेतल्यानंतर वैभव चिंतामण वाव्हळ, यश राजेंद्र वाव्हळ, श्रेयश सुधीर वाव्हळ या तीनही मुलांचे मृतदेह सापडले.
आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावात मिना नदीवर पोहायला गेलली तीन म घटना काल (दि.२९सप्टेंबर)ला सायंकाळी घडली होती. संपूर्ण रात्रभर या मुलांचा शोध स्थानिक नागरिकांकडून घेण्यात आला. तसेच एनडीआरएफलाही पाचारण करण्यात आले.
रविवारी घटस्थापनेची सुट्टी असल्याने ही मुले गावातील मीना नदीवर पोहायला गेली होती. यावेळी ही घटना घडली आहे. हे तिघेही सोळा वर्षांचे असून, गावातील विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होते. या घटनेने शिंगवे गावात शोककळा पसरली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.