पिंपरी चिंचवड ( पुणे ) - मावळमधील आढले खुर्द येथे वीस वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना आज (शुक्रवारी) सकाळच्या सुमारास घडली आहे. रोहन चंद्रकांत येवले असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अविनाश शिवाजी भोईर असे आरोपी तरुणाचे नाव आहे. रोहन आणि अविनाश दोघेही नातेवाईक आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रोहन आणि अविनाश यांच्यात दोन दिवसांपूर्वी वाद झाला होता. एकमेकांना त्यांनी शिवीगाळ देखील केली होती. याच, रागातून आज शुक्रवारी सकाळी रोहनला घराबाहेर बोलावले. त्यांच्यात झटापट झाली आणि यातूनच अविनाशने सोबत आणलेल्या पिस्तूलातून रोहनच्या दिशेने गोळ्या झाडल्या. यात रोहन हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात घेऊन जाण्यात आले. मात्र, त्याच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर अविनाशला देखील झटापटीत जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती शिरगाव पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - Mumbai Crime : बँक उपव्यवस्थापकाने ऑनलाइन जुगारात उडवली १.८५ कोटींची रक्कम