ETV Bharat / state

पुण्यातील हडपसर परिसरातून 18 पिस्तूल अन 27 जिवंत काडतुसे जप्त, सहा जणांची टोळी गजाआड

author img

By

Published : Sep 21, 2020, 8:06 PM IST

पुण्यातील हपडपसर परिसरातून पोलिसांनी 18 पिस्तूल व 27 जिवंत काडतुसे जप्त केली असून सहा जणांच्या टोळीला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस पथक
जप्त केलेल्या मुद्देमालासह पोलीस पथक

पुणे - येथील हडपसर परिसरातून पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला गजाआड केले असून त्यांच्या ताब्यातून मोठा शस्त्रसाठा जप्त केला आहे. गावठी बनावटीचे 18 पिस्तूल व 27 जिवंत काडतुसे व एक चोरीची मोटारसायकल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त
अरबाज खान, सूरज चिंचणे, कुणाल शेजवळ उर्फ यश, जयेश गायकवाड उर्फ जय, विकास भगत तौर उर्फ महाराज व शरद बन्सी मल्लाव, अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी हडपसर परिसरात गस्त घालत असताना त्यांनी संशयास्पद अवस्थेत फिरणाऱ्या अरबाज खानला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता एक पिस्तूल सापडले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करुन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने इतर आरोपींची नावे सांगितली. त्यानुसार पोलिसांनी इतर आरोपींना अटक करत पिस्तूल जप्त केली. या सर्व पिस्तुलाची किंमत 5 लाख 68 हजार इतकी आहे. अटकेत असलेले आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पुण्यासह ग्रामीण पोलिसात अनेक गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी त्यातील अनेकांवर पिस्तूल तस्करी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. आरोपींनी एवढा मोठा शस्त्रसाठा कशाला आणला होता? कोणाला दिला जाणार होता? की काही घातपात करायचा होता याचा तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - सरकारला खासगी डॉक्टरांवर विश्वास नसेल तर, त्यांनी आमची रुग्णालये स्वतः चालवावीत - आयएमए

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.