ETV Bharat / state

लाडक्या बहिणींना कधी मिळणार 2100 रुपयांचा हफ्ता ?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली 'ही' महत्वाची माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेच्या निधीबाबत भाष्य केलं.

Eknath Shinde On Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

Updated : 3 hours ago

मुंबई : विधानसभा निवडणूक 2024 निकाल महायुतीच्या बाजूनं लागला आहे. त्यामुळे आता महायुतीच्या बैठकांचं सत्र सुरू असून सत्ता स्थापनेच्या हालचालींना जोर आला आहे. दरम्यान, रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षानं गटनेतेपदी अजित पवार यांची नियुक्ती केल्यानंतर आता शिवसेना पक्षानंही विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली आहे. शिवसेनेच्या आमदारांची रविवारी रात्री उशिरा मुंबईतील बांद्रा येथील ताज लँड एन्ड हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांचा सत्कार केला, तसेच सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं.

Eknath Shinde On Ladki Bahin Yojana
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Reporter)

एकनाथ शिंदेंची एकमतानं निवड : शिवसेनेचे सर्व आमदार रविवारी सकाळपासूनच मुंबईत येत होते. त्यामुळे मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत सर्व आमदार दाखल झाले. तसेच दिवसभर भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या बैठका पार पडल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भेटण्यासाठी अनेक नेत्यांनी हजेरी लावली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वर्षा बंगल्यावर प्रफुल्ल पटेल, नारायण राणे आदी नेते भेटले. दुसरीकडं राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड झाल्यानंतर शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार उदय सामंत यांनी मांडलेल्या ठरावाला सर्व आमदारांनी एकमतानं संमती दर्शवली. आमदार प्रताप सरनाईक यांनी अनुमोदन दिलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना मार्गदर्शन केलं. एकनाथ शिंदेनी सर्व आमदारांचा सत्कार देखील केला. दरम्यान, या बैठकीत अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी उपस्थित राहत शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता शिवसेनेला चार अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्यानं शिवसेनेच्या आमदारांची संख्या 61 वर पोहोचली आहे. दरम्यान यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आम्हाला चांगलं यश मिळालं आहे. आमचे दहा ते बारा आमदार यांना हजार-बाराशे एवढी कमी मतं मिळाली. नाहीतर आमचे 67 आमदार आले असते. विरोधकांना विरोधी पक्षासाठी लागणारा आमदारांचा आकडा ही गाठता आला नाही. आता जनतेनं आपल्याला कौल दिला आहे. त्यामुळे आपल्या कामाची जबाबदारी आणखी वाढली आहे."

लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार : महायुतीच्या विजयाबद्दल लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं अभिनंदन केलं. यावेळी लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगल्यावर सत्कार केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "लाडक्या बहीण योजनेमुळे लाडक्या बहिणींच्या संसाराला हातभार लागला, आता आम्ही म्हटल्याप्रमाणं पंधराशे रुपयाचे 2100 रुपये देणार आहोत. लवकरच याबाबतचा निर्णय घेऊ. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 कोटी गरीब लोकांना गरिबीतून बाहेर काढलं. आम्ही सुद्धा राज्यात कोणी उपाशीपोटी झोपणार नाही, याची काळजी घेतोय. रोटी, कपडा आणि मकान हे सरकार गरिबांना देत आहे. तुम्ही लाडक्या बहिणींनी महायुती सरकारच्या पाठीमागे राहिला आणि आम्हाला भरघोस मतदान केलं. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार," असं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध झालं : माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत जवळपास अर्धा तास नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत चर्चा केली. भेटीनंतर बोलताना राणे म्हणाले की, "खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे, हे जनतेने आता सिद्ध केलं आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीतून पक्षश्रेष्ठी घेतील, त्यावर बोलण्याचा माझा अधिकार नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळेच माझ्या दोन मुलांचा विजयाचा मार्ग सुकर झाला" असं राणे म्हणाले.

हेही वाचा :

  1. शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड; नारायण राणे म्हणाले...
  2. "लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
  3. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत; म्हणाले, "लाडकी बहीण, लाडके भाऊ विजयाचे शिल्पकार"

Last Updated : 3 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.