राजगुरुनगर (पुणे) - जिल्ह्यातील जुन्नर आणि खेड तालुक्यात कोरोनाच्या संसर्गाचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंत्तेची बाब निर्माण झाली आहे. रविवारी खेड तालुक्यात १३, तर जुन्नर तालुक्यात ६ रुग्णांची वाढ झाली. तसेच चाकणमध्ये एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती पंचायत समिती सभापती अंकुश राक्षे, आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली.
दिवसेंदिवस तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खेड तालुक्यात ९१ पैकी ५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३८ जण उपचार घेत असून आतापर्यंत तिघांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तर जुन्नर तालुक्यात ५८ पैकी ३२ जणांनी कोरोनावर मात केली असुन २४ जण उपचार घेत आहेत.
खेड व जुन्नर तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असुन रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या दोन्ही तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे झाले आहे. आतापर्यंत खेड तालुक्यात कोरोनामुळे तिघांचा मृत्यू तर जुन्नर तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे
चाकण जवळील कडाचीवाडी येथील एका रुणाच्या संपर्कात आलेल्या १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने चाकण परिसरात करोनाची दहशत परसरली आहे. या १७ जणांच्या संपर्कात आलेल्या ४९ जणांचे स्वॅब अहवाल सोमवारी मिळणार आहेत. तर राजगुरुनगर शहरात कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात आलेल्या ११ जणांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने राजगुरूनगर शहरातील भीतीजन्य वातावरण निवळले आहे.
खेड, जुन्नर तालुक्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला; चिंतेत भर
दिवसेंदिवस दोन्ही तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. खेड तालुक्यात ९१ पैकी ५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ३८ जण उपचार घेत असून आतापर्यंत तिघांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे. तर जुन्नर तालुक्यात ५८ पैकी ३२ जणांनी कोरोनावर मात केली असुन २४ जण उपचार घेत आहेत.