ETV Bharat / state

पुणे विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1905, जिल्ह्याचा आकडा 1738वर

पुणे जिल्ह्यात 1 हजार 738 बाधित रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 43 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सोलापूर जिल्ह्यात 81 बाधित रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 30 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 13 बाधीत रुग्ण आहेत.

author img

By

Published : Apr 30, 2020, 6:21 PM IST

Dr. Deepak Mhaisekar
डॉ. दीपक म्हैसेकर

पुणे - विभागातील 305 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 905 झाली आहे. तर अ‌ॅक्टिव्ह रुग्ण 1 हजार 504 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 99 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 77 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यात 1 हजार 738 बाधित रुग्ण असून 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 43 बाधित रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर सोलापूर जिल्ह्यात 81 बाधित रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 30 बाधित रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 13 बाधीत रुग्ण आहेत.

पुणे जिल्ह्यातील 268 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्यात अ‌ॅक्टिव्ह रुग्ण 1 हजार 383 असून कोरोनाबाधित 90 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 76 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. आजपर्यंत विभागामध्ये एकूण 19 हजार 23 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 18 हजार 59चा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 964 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 16 हजार 212 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून 1 हजार 905चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागातील 62 लाख 89 हजार 701 घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 2 कोटी 42 लाख 11 हजार 256 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 414 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.