ETV Bharat / state

Pune Accident : चौथ्या मजल्यावरून लोखंडी रॉड कोसळून 16 वर्षीय मुलगा गंभीर जखमी; घटना सीसीटीव्हीत कैद - मुंढवामध्ये लोखंडी रॉड कोसळून मुलगा जखमी

घराच्या चौथ्या मजल्यावरून केबलची वायर ओढत असताना वायर ओढण्यासाठी वापरण्यात येणारी चार फुटांची लोखंडी सळई रस्त्यावरून पायी जाणाऱ्या बारा वर्षीय चिमुरड्याच्या डोक्यावर कोसळली. या घटनेमुळे मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सध्या जखमी मुलावर उपचार सुरु आहे.

मुंढवा पोलीस स्टेशन
मुंढवा पोलीस स्टेशन
author img

By

Published : Jan 2, 2022, 7:02 PM IST

Updated : Jan 2, 2022, 7:25 PM IST

पुणे - मुंढवा येथील भारत फोर्स कंपनी शेजारील साई पार्क सोसायटीमध्ये खासगी केबल व्यावसायिकाच्या निष्काळजीपणामुळे एका बारा वर्षीय मुलाचा जीव धोक्यात आला आहे. घराच्या चौथ्या मजल्यावरून केबलची वायर ओढत असताना वायर ओढण्यासाठी वापरण्यात येणारी चार फुटांची लोखंडी सळई रस्त्यावरून पायी जाणाऱ्या बारा वर्षीय मुलाच्या डोक्यावर कोसळली. या घटनेमुळे मुलगा गंभीर जखमी झाला आहे. सध्या जखमी मुलावर उपचार सुरु आहे.

सीसीटीव्हीत कैद झालेली घटना

जखमी मुलाची प्रकृती चिंताजनक

सध्या हडपसर येथील खासगी रुग्णालयात मुलावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून मुलगा शुद्धीवर आलेला नाही. या मुलाची परिस्थिती सध्या चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत मुलाच्या वडिलाने मुंढवा पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून केबल व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २८ डिसेंबर रोजी घडली असून तक्रार ३० डिसेंबर रोजी दाखल करण्यात आली आहे. संबंधित व्यावसायिकावर कलम ३३८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे.

हेही वाचा - Rapist Arrested : बलात्कारी प्रियकरास त्याच्याच लग्न समारंभातून अटक

Last Updated : Jan 2, 2022, 7:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.