पुणे - जिल्हयातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 538 झाली आहे. तर 230 कोरोना बाधित बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या अॅक्टिव रुग्ण संख्या 1 हजार 223 आहे. पुणे जिल्हयात एकुण 85 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 79 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
पुणे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 702 झाली आहे. विभागातील 264 बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर अॅक्टिव रुग्णांची संख्या 1 हजार 344 आहे. तसेच एकूण 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 80 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत.
जिल्हा | कोरोना रुग्णांची संख्या | मृत्यू |
पुणे | 1538 | 85 |
सातारा | 41 | 2 |
सोलापूर | 81 | 6 |
सांगली | 30 | 1 |
कोल्हापूर | 12 | 0 |
तर आतापर्यंत विभागामध्ये एकूण 17 हजार 747 नमूने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी 16 हजार 908 चे अहवाल प्राप्त झाले आहेत. तर 839 नमून्यांचा अहवाल प्रतिक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 15 हजार 151 नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 1 हजार 702 अहवाल पॉझिटिव्ह आहेत.