ETV Bharat / state

Jagdish Mulik on Kasba bypoll : 15ते 20 नगरसेवक भाजपाच्या संपर्कात- जगदीश मुळीक - Jagdish Mulik on Kasba bypoll

कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या उमेदवारीवरून नाराज असलेले, शैलेश टिळक प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीनंतर, पक्षाच्या कार्यकारणीच्या शहराच्या बैठकीला उपस्थिती लावून सक्रिय झाल्याचे दिसून आले. निवडणुकीच्या तयारीसाठी भारतीय भाजपाची सोमवारी शहर कार्यकारणी बैठक बोलवण्यात आली होती. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही बैठक घेतली. या बैठकीला शहरातील सगळे पदाधिकारी उपस्थित होते.

shailsh tilak join patrty meting
शैलेश टिळक बैठकीला उपस्थित
author img

By

Published : Feb 7, 2023, 9:27 AM IST

15ते 20 नगरसेवक भाजपाच्या संपर्कात, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची माहिती

पुणे: जगदीश मुळीक यांच्या बैठकीला नाराज असलेले मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलगा कुणाल टिळक दोघेही उपस्थित राहिले. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष याने त्यांची घरी जाऊन भेट घेतली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी सुद्धा फोन केल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे भेट देऊन गेल्याबरोबर कुणाल टिळक आणि शैलेश टिळक हे पक्षाच्या शहराच्या बैठकीला पक्ष कार्यालयात येऊन उपस्थित राहिले.

कुटुंबाची नाराजी केली दूर: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भेटीगाठीने, शिष्टाईने नाराज टिळक कुटुंबीयाची मनधरणी करण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले आहे. त्यामुळे हे दोघेही पुन्हा सक्रिय झालेले दिसत आहेत. भविष्यात यांना आणखी मोठी संधी देण्याची ग्वाही भाजपच्या नेत्यांनी दिलेली आहे. त्यामुळे आता टिळक कुटुंबाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून जात आहे.

दोघेही बैठकीत सक्रिय: शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले की, कुणाल टिळक आणि शैलेश टिळक या दोघांनी बैठकीत सक्रिय सहभाग घेऊन पूर्णपणे पाठिंबा दाखवला आहे. भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे की प्रथम राष्ट्र ,नंतर पक्ष, नंतर व्यक्ती हा विचार मानणार टिळक कुटुंबीय आहे. त्यांनी प्रचारात सहभाग घेतला आहे. प्रचारात उडी घेतली. कसबा विधानसभा मतदारसंघांमध्ये जेवढ्या कॉर्नरसभा होतील त्या बैठकीतील त्याचा नेतृत्व करण्याचे कुणाल टिळकांनी जाहीर केले आहे. त्याबद्दल मी टिळक परिवाराचा अभिनंदन करतो, असे जगदीश मुळीक म्हणाले आहेत.

केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र: जगदीश मुळीक पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी आणि काँग्रेस हा. कुठलाच मोठा मुद्दा नाही. ही निवडणूक त्यांच्या हातात निसटल्याचा चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे. सोमवारी सकाळी हजारोंच्या संख्येमध्ये भाजपचे कार्यकर्ते एकत्रित आले. हेमंत रासने यांचा फॉर्म भरला ती शक्ती आपण पाहिले तर प्रत्येक भागातून कार्यकर्ते एकत्र आले. एक विजय यात्रा झाल्यासारखे चित्र सकाळी झाले होते. दुपारी एक वेगळे चित्र पाहायला भेटले आहे. रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र, कसब्यात रवींद्र, अशा प्रकारच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणा केल्या. यांचा अर्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चाललेले सरकार चांगले काम करत आहे.

संघटनेची पकड कसब्यामध्ये मजबूत: राज्यामध्ये देवेंद्रशिवाय या राज्याला पर्याय नाही. हे स्पष्ट झाले. आमच्या पक्षाच्या देवेंद्रजींचा व नरेंद्रजींचा आधार त्यांना घ्यावा लागला. आज कसबामध्ये घ्यावासा वाटत आहे. एवढ्या खालच्या लेवला आज ते गेले आहेत. म्हणून रवींद्र धंगेकरांचे अभिनंदन करावे का? काय त्यांच्याबद्दल बोलावे लक्षात येत नाही? एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचा, विकास डेव्हलपमेंट याबाबतची भूमिका मान्य केलेली आहे. पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे संघटनेची पकड कसब्यामध्ये मजबूत असल्यामुळे तिथे आमचे सगळे नगरसेवक प्रत्येक बूथवरती काम करतील. प्रत्येक पदाधिकारी एकेक शक्ती केंद्रावरती काम करणार आहेत.

पक्ष एक विचार घेऊन चालतो: उमेदवारी भरताना शैलेश टिळकांची अनुपस्थिती होती. यावेळी बोलताना जगदीश मुळीक म्हणाले की, शैलेश टिळक हे त्यांच्या वैयक्तिक कारणामुळे उमेदवारी अर्ज भरायला येऊ शकले नाहीत. तसा त्यांनी निरोप दिला होता. ते पक्षाच्या प्रचारामध्ये ते असणार आहेत. पक्ष एक विचार घेऊन चालतो. पक्ष देशासाठी चांगले लोक घडविण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो. या देशातला प्रत्येक गोर-गरीब सुखी व्हावा यासाठी काम करतात. या विचारांमध्ये टिळक कुटुंबीय पहिल्यापासून सहभागी आहे. मुक्ताताईंचा वारसा पुढे नेण्याचे काम आज कुणाल आणि शैलेश टिळक करत आहेत.

टिळक परिवार भारतीय जनता पक्षा सोबत: टिळक परिवारातील सदस्याने उमेदवारीची मागणी केली होती. टिळक परिवार हा केवळ पुण्यात नाहीतर देशात प्रसिद्ध परिवार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी स्वातंत्र्यांमध्ये स्वातंत्र्याचे युद्धामध्ये देशाचे नेतृत्व केले. त्यामुळे या परिवाराला तेव्हापासून आजपर्यंत राजमान्यता आहे. टिळक परिवार भारतीय जनता पक्षा सोबत आहे. त्यांचा विचार निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीसाठी केला गेला. त्याचे निकष काय होते ते केंद्रीय समितीमार्फत ठरवले जाते. वरिष्ठान मार्फत ठरवले जाते, याविषयी आपण वरिष्ठांशी बोलू शकता. याबाबतीत आम्हाला माहिती नाही. परंतु त्यांचा विचार निश्चितपणे करण्यात आला. भविष्यामध्ये हे दोघे आमच्या पक्षाचे नेते असणार अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी माध्यमांना दिली आहे.

हेही वाचा : Kasba By Poll Election : कसबा भाजपा उमेदवार हेमंत रासने यांच्या हस्ते दगडूशेठ गणपतीची आरती; चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील उपस्थित

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.