दौंड (पुणे) - राज्य राखीव दलातील आणखी 15 जवानांचा कोरोना विषाणूचा वैद्यकीय तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आली आहे. ही माहिती दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी संग्राम डांगे यांनी दिली. आता दौंड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 25 झाल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीदरम्यान राज्यातील मुंबई येथे बंदोबस्तावर असलेल्या राज्य राखीव बल गट क्र. ७ च्या 95 जवानांची एक तुकडी काल दौंड येथे दाखल झाली होती. या सर्व जवानांची कोरोना विषाणूची तपासणी केली असता यातील 15 जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 6 जवानांचे वैद्यकीय अहवाल येणे बाकी असून 74 जवानांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
यापूर्वी दौंड तालुक्यात दहिटणे येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. आत्तापर्यंत राज्य राखीव दलातील 24 जवानांना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. आज पॉझिटीव्ह आलेल्या सर्व जवानांना पुणे येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे. तालुक्यातील नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन डॉ. डांगे यांनी केले आहे.
दौंड एसआरपी'त आणखी 15 जवान कोरोना पॉझिटिव्ह - coronavirus outbreak
यापूर्वी दौंड तालुक्यात दहिटणे येथे कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. आत्तापर्यंत राज्य राखीव दलातील 24 जवानांना कोरोनाची लागण झाल्याने तालुक्याच्या चिंतेत वाढ झाली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता शासनाच्या नियमांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.
![दौंड एसआरपी'त आणखी 15 जवान कोरोना पॉझिटिव्ह दौंड एसआरपी'त आणखी 15 जवान कोरोना पॉझिटिव्ह](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7121787-540-7121787-1588992121232.jpg?imwidth=3840)