ETV Bharat / state

धक्कादायक! पुण्यात मागील पाच दिवसात 12 जणांच्या आत्महत्या

मुलाच्या आजारपणाला कंटाळून एका 36 वर्षीय महिलेने केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. आजारी मुलासमोरच या महिलेने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारली.

12-suicides-in-last-five-days-at-pune
पुण्यात मागील पाच दिवसात 12 जणांच्या आत्महत्या
author img

By

Published : Jun 23, 2020, 6:12 PM IST

Updated : Jun 24, 2020, 3:41 PM IST

पुणे- कोरोना विषाणूशी सामना करीत असताना पुण्याला आणखी एका चिंतेने ग्रासले आहे. मागील पाच दिवसात तब्बल 10 हून अधिक नागरिकांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. नैराश्य, आर्थिक ओढाताण, कौटुंबिक वाद आणि लॉकडाऊनमुळे ओढवलेले आर्थिक संकट ही आत्महत्येमागील कारणे आहेत.

पुण्यात मागील पाच दिवसात 12 जणांच्या आत्महत्या

मुलाच्या आजारपणाला कंटाळून एका 36 वर्षीय महिलेने केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. आजारी मुलासमोरच या महिलेने पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. समर्थ पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (22 जून) घडली.

रविवारी (21 जून) समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्येची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. एका नेपाळी दाम्पत्याने कौटुंबिक वादातून गळफास घेत आयुष्य संपवले. तर रविवारी कोथरुड आणि सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आत्महत्येच्या आणखी दोन घटना घडल्या. कोथरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डुक्कर खिंडीतील एका उंच टेकडीवरुन उडी मारत महिलेने आत्महत्या केली. तर सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चप्पल व्यावसायिक तरुणाने गळफास घेतला.

18 जून रोजी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुखसागर नगरमध्ये एका दाम्पत्याने आर्थिक ओढातानीमुळे स्वतःच्या दोन मुलांना गळफास देऊन स्वतःही गळफास घेतला. आपल्या आत्महत्येसाठी कुणालाही जबाबदार धरू नये, अशी सुसाईड नोट त्यांनी भिंतीवर लिहून ठेवली होती. तर याच दिवशी सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका मंडप व्यावसायिकाने गळफास घेतला.

पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड भागात गुरुवारी (19 जून) तीन जणांनी आत्महत्या केल्या. यात एका संगणक अभियंत्याचाही समावेश आहे. 33 वर्षीय महिलेने आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. तर एका पुरुषाने गळफास घेतला. वाकड पोलीस ठाण्यात या सर्व घटनांची नोंद करण्यात आली आहे.

सातत्याने होणाऱ्या या आत्महत्येच्या घटनेवर बोलताना समर्थ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी बाळकृष्ण कदम म्हणाले की, मागील काही दिवसांपासून आत्महत्येचा आलेख वाढताना दिसत असला तरी या सर्व आत्महत्या लॉकडाऊनमुळे होत आहेत, असे म्हणता येणार नाही. या आत्महत्या वेगवेगळ्या कारणामुळे झाल्या आहेत. कुणी व्यसनी होते, कुणाला आजार होते, तर काहींमध्ये कौटुंबिक कलह होते. लॉकडाऊन काळात सतत घरात बसून रहावे लागले असल्यामुळे तणाव वाढला असावा. एकलकोंडेपणा म्हणा किंवा इतरत्र मन गुंतवायला जागा नसल्यामुळे एकाच गोष्टीचा जास्त विचार केल्यामुळे त्यांच्या हातून असे कृत्य घडले आहेत.

याविषयी बोलताना मानसोपचार तज्ञ आरती पेंडसे म्हणाल्या की, लॉकडाऊनमुळे बरेच नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. लॉकडाऊन हटवल्यानंतरही कोरोनाची धास्ती आहेच. त्यामुळे या परिस्थितीत नैराश्य आणि तणाव वाढीचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनाही यावर मात करण्यासाठी वेगवेगळे उपाय अवलंबले पाहिजे. त्यासाठी जवळच्या व्यक्तीशी संवाद साधला पाहिजे. या परिस्थितीत घाबरुन न जाता, निराश न होता पर्यायी मार्ग शोधला पाहिजे.

Last Updated : Jun 24, 2020, 3:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.