पुणे- आज सर्वत्र विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरु आहे. यामध्ये लोक प्रतिनिधी, नागरिक आणि कलाकार हे मोठ्या संख्येने लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होत आहे. पुण्यातील लोहगाव भागात राहणारे १०२ वर्षाचे आजोबा हाजी इब्राहिम जोड हे रूग्णालयात उपचार घेत होते. त्यांनी आज रुग्णालयातून बाहेर पडून कुटुंबातील ४० सदस्यांसोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.
१०२ वर्षांचे असताना हाजी ईब्रमाहिम यांचा मतदान करण्याविषयीचा उत्साह पाहून लोकांकडून त्यांचे कौतुक होत आहे. हाजी इब्राहिम जोड यांनी आत्तापर्यंत प्रत्येक निवडणुकीत मतदान केले आहे. गेल्या चार दिवसांपासून ते आजारी आहे, मात्र त्यांनी नातवंड आणि मुलांना सांगितले की, मला आज मतदान करायचे आहे. त्यावर डॉक्टरांची परवानगी घेऊन रुग्णालयातून बाहेर येऊन त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
हेही वाचा- 'राज्यासह पुण्यात काँग्रेसचे अस्तित्वच दिसत नाही'