ETV Bharat / state

पुणे विभागात 1 हजार 457 कोरोनाबाधित; तर पुणे जिल्ह्यातील संख्या 1 हजार 319

पुणे जिल्ह्यात 1 हजार 319 बाधित रुग्ण आहेत तर 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 33 बाधित आहेत आणि 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 65 बाधित रुग्ण आहेत तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 29 बाधित रुग्ण आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 11 बाधित आहेत.

डॉ. दीपक म्हैसेकर
डॉ. दीपक म्हैसेकर
author img

By

Published : Apr 27, 2020, 7:33 PM IST

पुणे - विभागातील 230 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे पुणे विभागातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 457 झाली आहे. तर अ‌ॅक्टिव्ह रुग्ण 1 हजार 139 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 88 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 48 रुग्ण गंभीर आहेत. उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यात 1 हजार 319 बाधित रुग्ण आहेत तर 80 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 33 बाधित आहेत आणि 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 65 बाधित रुग्ण आहेत तर 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 29 बाधित रुग्ण आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 11 बाधित आहेत.

हेही वाचा - रोगराईच्या संकटामुळे राजावर येणार तणाव, भेंडवळच्या मांडणीचे भाकीत

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 15 हजार 811 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 14 हजार 935 जणांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 877 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 13 हजार 428 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आहे. त्यात 1 हजार 457 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. तर आतापर्यंत विभागामधील 54 लाख 35 हजार 546 घरांचे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्याअंतर्गत 2 कोटी 6 लाख 3 हजार 94 व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1 हजार 131 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भित करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.