ETV Bharat / state

Parbhani Year Ender 2021 : वर्षभरातील 'या' घटनांमुळे परभणी जिल्हा राहिला चर्चेत! - year ender 2021 from parbhani

2021 हे वर्षे परभणी जिल्ह्यासाठी विविध कारणांनी राज्यात चर्चेत राहिले. यात राज्यपालांचा दौरा, वैद्यकीय महाविद्यालयाचा लढा, राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वादंग याचीही जोरदार चर्चा झाली. त्याप्रमाणेच कोरोना, राजकारण, भ्रष्टाचार, गुन्हेगारी तसेच अन्य काही घडामोडींनी देखील 2021 वर्ष चांगलेच गाजले. यासंदर्भातच 'ई टीव्ही भारत'ने घेतलेला हा मागोवा 2021...(Parbhani Year Ender 2021)

parbhani year ender 2021
परभणी जिल्हा मागोवा 2021
author img

By

Published : Dec 29, 2021, 5:28 PM IST

Updated : Dec 29, 2021, 10:54 PM IST

परभणी - महाराष्ट्रातील सर्वाधिक इंधन दर परभणीत (Fuel Hike in Parbhani) असून, याची सरत्या 2021 सालात मोठी चर्चा झाली. त्याप्रमाणेच पाकिस्तानातून परतलेली गीता (Geeta) आपलं मूळ घर शोधण्यासाठी संपूर्ण देशभर फिरली. परंतु अखेर तिने परभणीत (Parbhani) वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला. याप्रमाणेच राज्यपालांचा दौरा, वैद्यकीय महाविद्यालयाचा लढा, राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत वादंग याचीही जोरदार चर्चा झाली. त्याप्रमाणेच कोरोना, राजकारण, भ्रष्टाचार, गुन्हेगारी तसेच अन्य काही घडामोडींनी देखील 2021 वर्ष चांगलेच गाजले.

  1. ....अखेर 'गीता' चे वास्तव्य परभणीतच! : सुमारे 5 वर्षांपूर्वी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नाने पाकिस्तानातून भारतात परतलेल्या गीताच्या कुटुंबीयांचा शोध अजूनही 100 टक्के पूर्ण झालेला नाही. मात्र, असे असताना काही माध्यमांमधून गीता परिवारात जवळ पोहोचल्याचे वृत्त येत होते. दरम्यान, मार्च महिन्यात परभणी जिल्ह्यातील जिंतूर येथे त्यावेळी राहणाऱ्या मीना पांढरे यांनी 'गीता माझीच मुलगी आहे', असा दावा केला होता. त्यांनी गीताच्या शरीरावर असलेल्या काही खुणा देखील सांगितल्या असून, त्या मिळत्याजुळत्या आहेत. परंतू, असे असले तरी डीएनए चाचणी नंतरच योग्य निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे सरकारने लवकर डीएनए चाचणी घ्यावी, अशी मागणी आतापर्यंत गीताचा सांभाळ करणारे इंदोर येथील आनंद सेवा सोसायटीचे ग्यानेन्द्र पुरोहित यांनी केले आहे. दरम्यान, गीता सध्या परभणी येथील पहल संस्थेचे अनिकेत सेलगावकर यांच्याकडे गेल्या 9 महिण्यापासून वास्तव्यास आहे. या ठिकाणी ती सांकेतिक भाषेचा कोर्स पूर्ण करत आहे.
    parbhani year ender 2021
    गीता
  2. कोरोना काळ आणि आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार - परभणी शहरातील आयटीआयच्या इमारतीत कार्यान्वित केलेल्या कोविड सेंटरमधून 14 मार्च रोजी कोरोनाचे 2 संशयित रुग्ण पळून गेले होते. अखेर ते सापडलेच नाही. विशेष म्हणजे त्यापूर्वी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना हॉस्पिटलमधून जिल्हा कारागृहातील कैदी पळून गेले होते. त्यानंतर पोलिसांनी मोठी धावपळ करून त्यांना हिंगोली जिल्ह्यातून अटक केली. याशिवाय जिल्हा रुग्णालय आणि जिल्हा परिषदेच्या कोरोना रुग्णालयाच्या इमारतींमध्ये आग लागण्याच्या घटना अनेकदा घडल्या. तसेच व्हेंटिलेटरवरील एका तरुण रुग्णाला उपचार न मिळाल्याने तर अन्य एका 65 वर्षीय रुग्णाचा ऑक्सीजनअभावी मृत्यू झाल्याचा प्रकार घडला. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा रुग्णालयातील या भोंगळ कारभाराची चौकशी करण्यासाठी त्यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी चौकशी समित्या स्थापन केल्या. यामध्ये आग लागण्याच्या घटना, कैदी पळून गेल्याची घटना तसेच कोरोना बाधितांना वेळेआधी सुट्टी देणे, अशा सर्व भोंगळ कारभारासंदर्भात या समित्या नेमल्या होत्या. मात्र, कुठल्याच समितीचा अहवाल अद्याप प्रशासनाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे कुठल्याच अधिकारी तसेच कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली नाही, हे विशेष..
    parbhani year ender 2021
    कोविड रुग्णालय
  3. आघाडीत बिघाडी होऊनही काँग्रेसचे आमदार वरपूडकर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी - गेल्या वर्षभरात लहान-मोठ्या अनेक निवडणुका झाल्या. मात्र, यातील जिल्हा बँकेची निवडणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरली. राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी एकत्र असताना परभणीतील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मात्र राष्ट्रवादीने चक्क भाजपला पाठिंबा दिला होता. परंतु, असे असताना देखील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश वरपुडकर यांनी अनुभवतून खेळलेल्या राजकीय खेळीमुळे ते स्वतः जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवडून आले. विशेष म्हणजे त्यांच्यासह उपाध्यक्षपदी हिंगोलीचे राजेश पाटील गोरेगावकर यांचीही बिनविरोध निवड झाली. भाजप नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या गटाकडून शेवटपर्यंत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होईल, असे वाटत असतानाच प्रत्यक्षात ही निवड बिनविरोध झाली. त्यामुळे अनेक राजकीय तज्ञांची गणिते बिघडली.
    parbhani year ender 2021
    जिल्हा बँक निवडणूक
  4. एकाच दिवशी 232 मिलिमीटर पाऊस - परभणी शहर आणि तालुक्यातील बहुतांश भागात इतिहासात कधीही झाला नाही एवढा पाऊस अवघ्या काही तासात 12 जुलैच्या मध्यरात्री पडला. ज्याची नोंद तब्बल 232 मिलिमीटर एवढी झाली. या प्रचंड पावसामुळे शहरी भागात तर पाणीचपाणी झाले शिवाय ग्रामीण भागात देखील दाणादाण उडाली होती. पिकांचे प्रचंड नुकसान झाले. विविध ओढे-नाले आणि नद्यांना पूर आल्याने असंख्य गावांचा संपर्क तुटला होता. अनेक गावकरी पुराच्या पाण्यात अडकले होते. प्रत्येकाने जीव वाचवण्यासाठी जीवाची पराकाष्टा केली. यातील एक भयंकर प्रकार परभणी तालुक्यातील शिरसी बुद्रुक याठिकाणी अनुभवयास मिळाला. या गावातील विविध शेतकऱ्यांच्या मेंढ्या चरण्यासाठी नेणाऱ्या 3 मेंढपाळांनी रात्रभर अक्षरशः मृत्यूशी झुंज दिली. त्या तुफान पावसाने गावात नदीला जोरदार पूर आला होता. या पुराच्या पाण्यात त्यांच्या सुमारे अडीचशे मेंढ्या वाहून जात होत्या. त्यामुळे या मेंढपाळांनी जीवाची बाजी लावून त्यातील 40 मेंढ्यांना वाचवले. तर स्वतः एका झाडाच्या आधाराने रात्रभर पुराच्या पाण्याशी झगडत राहिले. विशेष म्हणजे 2 मेंढपाळ केवळ 14 आणि 15 वर्षाचे होते.
    parbhani year ender 2021
    पाऊस
  5. डीवायएसपींच्या 2 कोटीचे लाच प्रकरण गाजले -परभणी जिल्ह्यातील सेलू येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र गमकरण पाल व पोलीस नाईक गणेश लक्ष्मणराव चव्हाण या दोघांनी जुलै महिन्यात एका तक्रारदाराकडून मगितलेली तब्बल 2 कोटी रुपयांची लाच चांगलीच गाजली. यात तडजोडीअंती 1 कोटी 50 लाख रुपयांची लाच घेण्याचे ठरले होते. त्यापैकी दहा लाख रुपयांची लाच स्वीकारतांना त्यांच्यावर थेट मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे एका तक्रारदाराच्या मित्राचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या प्रकरणात 3 मे 2019 रोजी सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील मयत व्यक्तीच्या पत्नी सोबत तक्रारदाराचे मोबाईलवरील संभाषण मी ऐकली असून, त्यातून तुला बाहेर पडावयाचे असेल तर मला दोन कोटी रुपये द्यावे लागतील' अशी मागणी डीवायएसपी पाल यांनी केली होती. मात्र त्यानंतरच्या तपासात तक्रारच हा मित्राचा मारेकरी निघाला. त्याने सुपारी देऊन मित्राचा काटा काढला होता. त्यामुळे आता डीवायएसपीसह तक्रारदार जेलची हवा खात आहेत.
    parbhani year ender 2021
    डीवायएसपी पाल
  6. जनशक्तीपूढे राजकीय शक्तीचा धुरळा; अखेर आंचल गोयल रुजू : कडक शिस्तीच्या तथा कठोर सनदी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या आंचल गोयल या परभणी जिल्हाधिकारीपदी रुजू होऊ नयेत म्हणून, ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी मोठी राजकीय शक्ती पणाला लावली होती. मात्र, जनशक्तीपुढे राजकीय शक्तीचा धुरळा उडाला, असेच म्हणावे लागेल. कारण जनरेट्यामुळे शासनाला परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून गोयल यांची नियुक्ती कायम ठेवावी लागली. आणि अखेर त्या 5 ऑगस्ट रोजी परभणीत रुजू झाल्या. तत्पूर्वी, तत्कालीन जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर हे 31 जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. तर त्यापूर्वीच 13 जुलैला परभणीच्या जिल्हाधिकारी म्हणून आंचल गोयल यांची नियुक्ती शासनाकडून जाहीर झाली होती. त्यानुसार त्या पदभार घेण्यासाठी 27 जुलैलाच परभणीत दाखलही झाल्या. परभणीत काम करायचे म्हणून त्यांनी परभणी जिल्ह्याचा आढावा घेण्याचे काम देखील सुरू केले. मात्र, या नियुक्ती मध्ये राजकीय हस्तक्षेप झाला. शिवसेना खासदार संजय जाधव यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावून दोन दिवस मंत्रालयात बसून 31 जुलैला आंचल गोयल यांना रुजू करून घेण्यात येऊ नये, म्हणून आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावण्याचे सांगितल्या जाते. त्यात त्यांना यश देखील आले. त्यानुसार गोयल यांना पदभार न देता राज्य शासनाकडून या ठिकाणचे अप्पर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांना पदभार देण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी मुगळीकर यांना प्राप्त झाले. त्यानुसार त्यांनी निवृत्तीचा निरोप घेताना काटकर यांच्याकडे आपली सूत्रे सोपवली होती. परंतु त्यानंतर सामान्य परभणीकरांनी माध्यमांच्या सहकार्याने उठाव करून अचल गोयल यांच्या नियुक्तीचे आदेश कायम ठेवण्यासाठी शासनाला भाग पाडले. त्यामुळे सुमारे 15 दिवसांच्या राजकीय तथा नाट्यमय घडामोडीनंतर आंचल गोयल या जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या.
    parbhani year ender 2021
    जिल्हाधिकारी आंचल गोयल
  7. राज्यपाल कोश्यारी यांचा दौरा आणि वाद - ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच राज्यपाल भगतसिंग को शायरी यांनी परभणीचा तीन दिवसीय दौरा केला हा दौरा जाहीर झाल्यापासूनच तो वादाच्या भोवऱ्यात सापडला. या दौऱ्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आढावा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी 'राज्यपाल समांतर यंत्रणा चालू पाहतात की काय, असे म्हणत या प्रकारावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष किरण सोनटक्के यांनी राज्यपालांनी राजकिय पक्षांप्रमाणे बैठका घेऊ नयेत, अन्यथा राज्यपालांना दौऱ्यादरम्यान काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे हा वाद आणखी चिघळला. तसेच त्यांच्या दौऱ्याचा फटका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात असलेल्या पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाला बसला. दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर हे महाविद्यालय बंद राहिले. त्यामुळे तब्बल 200 मुक्या जनावरांची फरफट झाली. चारा-पाण्याअभावी या जनावरांना मोठा त्रास सहन करावा लागला. या प्रकरणी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता नितीन मार्कंडेय यांनी विद्यापीठाच्या गलथान कारभाराविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केली होती.
    parbhani year ender 2021
    राज्यपाल कोश्यारी
  8. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी लढा - 'जिल्ह्यात तब्बल साडेपाचशे खाटांचे जिल्हा रुग्णालय असताना देखील या ठिकाणी शासकीय महाविद्यालयाची निर्मिती होत नाही. यासंदर्भात येथील खासदार संजय जाधव यांच्यासह विविध पक्ष, संघटनांच्या नेत्यांनी शासनाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र, शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे या महाविद्यालयासाठी 21 ऑगस्टपासून खासदार जाधव यांच्या नेतृत्वात परभणीकरांनी तीव्र लढा उभारला होता. सुरुवातीला सह्यांची मोहीम राबविली. त्यानंतर धरणे आंदोलन, रास्तारोको तसेच लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्याउपरही शासनाकडून निर्णय न झाल्यास खासदार जाधव स्वतः प्राणांतिक उपोषण करणार होते. मात्र वरिष्ठ नेत्यांनी केलेल्या विनंतीमुळे त्यांनी हे पाऊल मागे घेतले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी बोलताना परभणीत वैद्यकीय महाविद्यालय मंजूर केल्याची घोषणा केली. परंतु त्यास आता 3 महिने झाले, तरी अद्याप वैद्यकीय महाविद्यालयाची कुठलीच कारवाई झालेली नाही. त्यामुळे परभणीकर महाविकास आघाडी सरकारवर नाराज आहेत.
    parbhani year ender 2021
    वैद्यकीय महाविद्यालय आंदोलन
  9. उच्चांकी आणि परभणीकरांचा संताप - देशात इंधनाच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यात राज्यातील सर्वाधिक दर परभणीत असतात. या उच्चांकी दरामुळे येथील वाहनधारक कायम संताप व्यक्त करत असतात. आहेत. 29 ऑक्टोबर रोजी परभणीत पेट्रोल तब्बल 117.34 रुपये प्रति लिटर एवढ्या दराने विक्री झाले. तर सर्वात आधी परभणीत शंभरी पार करणारे डिझेल तब्बल 106.62 रुपयाने विक्री झाले. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरात पेट्रोल सुमारे 26 तर डिझेल 23 रुपयांनी महागले. ज्याचा परिणाम परभणी जिल्ह्यातील महागाईवर झाल्याचे दिसून आले. दरम्यान, इंधनाच्या रेकॉर्डब्रेक किंमतीमुळे परभणी नेहमीच चर्चेत असते. या मागील मुख्य कारण म्हणजे जिह्यातील भारत पेट्रोलियमच्या पंपाना 330 किमी दूर असलेल्या मनमाड डेपोतून तर हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपाना सोलापूर येथून इंधन पुरवठा होतो. यामुळे वाहतूकीवर मोठा खर्च होतो. परिणामी इंधनाच्या किंमती वाढतात. त्यामुळे परभणीत किंवा जवळच्या एखाद्या मोठ्या शहरात इंधनाचा डेपो उभारावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र, याकडे अजूनही शासन आणि प्रशासनाचे दुर्लक्षच आहे.
    parbhani year ender 2021
    इंधन दर
  10. आमदार बाबाजानी दुर्रानी यांचा राजीनामा; मारहाणीचीही चर्चा :राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा विधानपरिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी यांना 19 नोव्हेंबर रोजी पाथरीतील एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात मोहम्मद बिन किलेब याने अचानक येऊन चापट बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच यावेळी त्याने 'आपल्याकडे पिस्तूल असते तर गोळ्या घातल्या असत्या', असे धमकावले. त्यामुळे पाथरीत तणाव निर्माण झाला होता त्यानंतर सदर आरोपीला अटक कधी झाली. याप्रमाणेच आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी पक्षातील दुसऱ्या फळीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त करत आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांच्यासह त्यांचे समर्थक हे पक्ष सोडण्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. अनेक जणांनी ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याचे भाकित देखील केले. तसेच त्यांच्या समर्थकांनी देखील काँग्रेस, शिवसेना आणि भाजपकडून निमंत्रण नसल्याचे सांगितले. हे प्रकरण जिल्ह्यात चांगलेच गाजले होते. शिवाय आजही आमदार दुर्रानी यांच्यासह त्यांच्या समर्थकांचे राजीनामे कायम असून, त्यावर कुठलाही तोडगा निघालेला नाही.
    parbhani year ender 2021
    आमदार बाबाजानी दुर्रानी
  • वाचा Year Ender 2021 एका क्लिकवर -

Ahmednagar District Year Ender 2021 - मोहटादेवी सोने प्रकरणासह 'या' घटनांमुळे अहमदनगर जिल्हा वर्षभर चर्चेत राहिला

Solapur District Year Ender 2021 - कोरोना महामारीसह 'या' घटनांमुळे सोलापूर जिल्हा वर्षभर चर्चेत राहिला

Year Ender 2021 : एसटी कर्मचाऱ्यांच्या ऐतिहासिक संपाचा घेतलेला आढावा

Year Ender 2021: 2021 मधील 'या' 21 महत्त्वाच्या घटना राहणार संस्मरणीय

Last Updated : Dec 29, 2021, 10:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.