परभणी - कोरोना विषाणूचा जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नाही. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील यात्रा, महोत्सव, संमेलन, मेळावे आणि आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डी.एम.मुगळीकर यांनी दिले आहेत. प्रशासन स्तरावर देखील काळजी घेण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने होणारी हजेरी बंद करण्यात आली असून, पूर्वीप्रमाणे रजिस्टरवर सह्या घेऊन हजेरी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, नागरिकांनी वारंवार हात धुवावेत, शिंकताना व खोकताना तोंडावर रुमाल वापरावा तसेच परिसरात स्वच्छता ठेवावी. हस्तांदोलन व यात्रा, महोत्सव आदि गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, नागरिकांनी वारंवार हात धुवावेत, शिंकताना व खोकताना तोंडावर रुमाल वापरावा तसेच परिसरात स्वच्छता ठेवावी. हस्तांदोलन व यात्रा, महोत्सव आदि गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आवश्यक उपाययोजना करण्यासाठीची बैठक घेण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बीपी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अंकुश पिनाटे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागरगोजे उपस्थित होते.
हेही वाचा - व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर सतत अत्याचार; आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
कोरोनाबाबतच्या जनजागृतीसाठी शहरात होर्डिंग्स लावून तसेच रेल्वे स्थानक, आकाशवाणी केंद्र व बस स्थानकावरुन नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, दुबईवरून परतलेल्या जिल्ह्यातील ५ व्यक्तींची प्राथमिक तपासणी करून नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. विशेष कक्ष म्हणून शहरात महापालिकेचे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि एरंडेश्वर आरोग्य केंद्र आरक्षीत ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची बायोमेट्रीक प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात येणारी हजेरी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्यात आली आहे.
यात्रा आणि धार्मिक कार्यक्रम रद्द -
दरम्यान, कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्ह्यातील यात्रा, महोत्सव आणि धार्मिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. यामध्ये पाथरी तालुक्यातील गुंज येथील योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचा १५ ते २२ मार्च दरम्यान होणारा पुण्यतिथी उत्सव रद्द करण्यात आला आहे. याशिवाय जिल्ह्यातील त्रिधारा, फळा, यशवाडी, सोनपेठ, गंगाखेड आधी श्रीक्षेत्र ठिकाणच्या मोठ्या धार्मिक स्थळांवरील कार्यक्रमदेखील रद्द करण्यात आले आहेत. याशिवाय महोत्सव, इस्तेमा, मेळावे, धम्म परिषद आणि आठवडी बाजार देखील भरू नयेत, अशाही सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
हेही वाचा - परभणीत चिकन व्यवसायाला 'कोरोना'चा फटका; कोंबडीचे दर १० रुपयांवर