ETV Bharat / state

परभणीत मतदानाला सुरुवात; सुमारे 14 लाख मतदार बजावणार हक्क

author img

By

Published : Oct 21, 2019, 8:45 AM IST

संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या राज्य विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या २८८ जागा, तर सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होईल. आज राज्यातील तब्बल ३,२३७ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.

परभणीत मतदानाला सुरुवात

परभणी - जिल्ह्यातील पाथरी, जिंतूर, गंगाखेड आणि परभणी विधानसभा मतदारसंघासाठी आज(सोमवार) मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. आज दिवसभरात जवळपास 13 लाख 99 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. दरम्यान, परभणी शहरातील शारदा महाविद्यालय या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या ठिकाणी पावसामुळे एखाद-दुसरा मतदार येऊ लागला आहे. परंतु मतदारांमध्ये तेवढाच उत्साह असून, दिवसभर मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा - वांद्रे पूर्वेत मतदानाला सुरुवात; 11 वाजता ठाकरे कुटुंबीय करणार येथे मतदान

परभणी जिल्ह्यात 1178 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये 56 मतदान केंद्रे हे संवेदनशील आहेत. त्यांच्यावर पोलिसांचा तसेच जिल्हा प्रशासनाचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. दरम्यान, चार मतदान केंद्रे हे आदर्श मतदान केंद्र म्हणून असून, चार मतदान केंद्रे सखी मतदान केंद्र असतील. या दोन्ही मतदान केंद्रांवर मतदारांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाणार आहे. जेणेकरून लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करता येईल, हा उद्देश यामागे जिल्हा प्रशासनाचा आहे.

प्रतिनिधी गिरीराज भगत यांनी घेतलेला आढावा

फ्लॅश बॅक - Maharashtra Assembly Election 2019

राज्यात ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750, महिला मतदार - 4 कोटी 28 लाख 43 हजार 635, तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत, दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत, सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत.

या निवडणुकीसाठी राज्यभरात तब्बल 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत. या केंद्रांवर 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

Intro:परभणी जिल्ह्यातील पाथरी जिंतूर गंगाखेड आणि परभणी विधानसभा मतदार संघासाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. आज दिवसभरात 13 लाख 99 हजार अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावतील. दरम्यान, परभणी शहरातील शारदा महाविद्यालय या मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या ठिकाणी पावसामुळे एखाद-दुसरा मतदार येऊ लागला आहे. परंतु मतदारांमध्ये तेवढाच उत्साह असून, दिवसभर मोठ्या प्रमाणात मतदान होण्याची शक्यता आहे

Body:परभणी जिल्ह्यात 1178 मतदान केंद्रावर आज मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये 56 मतदान केंद्रे हे संवेदनशील आहेत.त्यांच्यावर पोलिसांचा तसेच जिल्हा प्रशासनाचा विशेष बंदोबस्त राहणार आहे. दरम्यान चार मतदान केंद्रे हे आदर्श मतदान केंद्र म्हणून असून, चार मतदान केंद्रे सखी मतदान केंद्र असतील. या दोन्ही मतदान केंद्रांवर मतदारांच्या पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाणार आहे. जेणेकरून लोकशाहीच्या या उत्सवात मतदारांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करता येईल, हा उद्देश यामागे जिल्हा प्रशासनाचा आहे. दरम्यान पावसाचे सावट असले तरी मतदारांना मतदानासाठी दुपारी बारा वाजेपर्यंत गर्दी होण्याची शक्यता आहे. दोन दिवसापासून परभणीत परतीचा पाऊस मुक्कामी असून, या पावसाने मतदानावर परिणाम होणार आहेत.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- wkt & voting center vis

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.