ETV Bharat / state

परभणीकरांना मतमोजणीचे वेध; 84 टेबलांवर होणार मतमोजणी - मतमोजणी

दरम्यान, मतमोजणी केंद्रावर मोजणीच्या दिवशी नियुक्त केलेले कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कर्मचारी आणि प्रतिनिधींनी मोबाईल आणू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने त्यांना दिल्या आहेत.

परभणीकरांना मतमोजणीचे वेध; 84 टेबलांवर होणार मतमोजणी
author img

By

Published : May 18, 2019, 8:24 PM IST

परभणी - लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान पार पडले. मतमोजणी 23 मे रोजी होणार असून यासाठी परभणीच्या कृषी विद्यापीठात 84 टेबलांचे नियोजन करण्यात आले आहे. साधारणपणे 24 ते 29 फेऱ्यांमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार आहे. दरम्यान, परभणीत झालेल्या अटी-तटीच्या सामन्यामुळे येथील प्रत्येक मतदाराला मतदान मोजणीच्या दिवसाचे वेध लागले आहे.

परभणीकरांना मतमोजणीचे वेध; 84 टेबलांवर होणार मतमोजणी

तब्बल 19 लाखाहून अधिक मतदारसंख्या असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी 12 लाख 53 हजार 612 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सुमारे 63.19 टक्के मतदान झाले असून त्यांची मतमोजणी 23 मे रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूममध्ये मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन आणि व्हिव्हीपॅट ठेवण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या संपूर्ण इमारतीला पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून याठिकाणी संबंधितांशिवाय एकही व्यक्ती फिरकणार नाही, याची काळजी पोलीस घेत आहेत. इमारतीची सुरक्षा राखीव पोलीस दल यांच्या हातात असून याठिकाणी पोलीस निरीक्षक आणि काही साहाय्यक पोलीस निरीक्षकांचे त्यांच्यावर नियंत्रण आहे.

दरम्यान, या ठिकाणी मतमोजणीसाठी 84 टेबलचे नियोजन करण्यात आले आहे. याप्रमाणेच चार टेबलांवर पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी होणार आहे. तसेच परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघांपैकी परभणी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 22 फेऱ्यांमध्ये तर जिंतूर, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रत्येकी 29 फेऱ्यांमध्ये होणार आहे. याशिवाय परतूर 24 आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 25 फेऱ्यांमध्ये होणार आहे.

दरम्यान, मतमोजणी केंद्रावर मोजणीच्या दिवशी नियुक्त केलेले कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कर्मचारी आणि प्रतिनिधींनी मोबाईल आणू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने त्यांना दिल्या आहेत.

एकूणच रविवारी लोकसभेच्या रणांगणातील शेवटचे मतदान होणार आहे. त्यानंतर 23 तारखेला होणाऱ्या मतमोजणीचे देशवासीयांना वेध लागले असून, परभणीत झालेल्या अटी-तटीच्या सामन्यामुळे लोकांची उत्सुकता अधिक ताणली गेल्याचे दिसून येत आहे.

Intro: परभणी - परभणी लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिल रोजी मतदान पार पडले. मतमोजणी 23 मे रोजी होणार असून यासाठी परभणीच्या कृषी विद्यापीठात 84 टेबलचे नियोजन करण्यात आले आहे. साधारणपणे 24 ते 29 फेऱ्यांमध्ये प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी होणार आहे. दरम्यान, परभणीत झालेल्या अतीतटीच्या सामन्यामुळे येथील प्रत्येक मतदाराला मतदान मोजणीच्या दिवसाचे वेध लागले आहेत.

Body:तब्बल 19 लाखाहून अधिक मतदारसंख्या असलेल्या परभणी लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी 12 लाख 53 हजार 612 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. सुमारे 63.19 टक्के मतदान झाले असून त्यांची मतमोजणी 23 मे रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात होणार आहे. या ठिकाणच्या स्ट्रॉंग रूममध्ये मतदान झालेल्या ईव्हीएम मशीन आणि व्हिव्ही पॉट ठेवण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या संपूर्ण इमारतीला पोलिसांचा तगडा बंदोबस्त असून याठिकाणी संबंधितांशिवाय एकही व्यक्ती फिरकणार नाही, याची काळजी पोलीस घेत आहेत. इमारतीची सुरक्षा राखीव पोलीस दल यांच्या हातात असून याठिकाणी पोलीस निरीक्षक आणि काही सहाय्यक पोलीस निरीक्षकांचे त्यांच्यावर नियंत्रण आहे. दरम्यान, या ठिकाणी मतमोजणीसाठी 84 टेबल चे नियोजन करण्यात आले आहे. याप्रमाणेच चार टेबलांवर पोस्टल बॅलेट पेपरची मतमोजणी होणार आहे. तसेच परभणी लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा पैकी परभणी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी 22 फेऱ्यांमध्ये तर जिंतूर, गंगाखेड आणि पाथरी विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी प्रत्येकी 29 फेऱ्यांमध्ये होणार आहे. याशिवाय परतूर 24 आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी 25 फेऱ्यांमध्ये होणार आहे. दरम्यान, मतमोजणी केंद्रावर मोजणीच्या दिवशी नियुक्त केलेले कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. कर्मचारी आणि प्रतिनिधींनी मोबाईल आणू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने त्यांना दिले आहेत.
एकूणच रविवारी लोकसभेच्या रणांगणातील शेवटचे मतदान होणार आहे. त्यानंतर 23 रोजी होणाऱ्या मतमोजणीचे देशवासीयांना वेध लागले असून, परभणीत झालेल्या अतीतटीच्या सामन्यामुळे लोकांची उत्सुकता अधिकच ताणल्या गेल्याचे दिसून येत आहे.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- strong room vis 1 & 2

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.