ETV Bharat / state

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बहुउपयोगी कृषी अवजारांचे प्रदर्शन - कृषी अवजारे प्रदर्शन

परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात बहुउपयोगी कृषी अवजारांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यात विविध अत्याधुनिक कृषी अवजारे शेतकऱ्यांना पाहण्यासाठी उपलब्ध करण्यात आली.

कृषी अवजारांचे प्रदर्शन
author img

By

Published : Mar 1, 2019, 2:40 PM IST

परभणी - वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी यांत्रिकीकरण दिनानिमित्‍त बहुउपयोगी कृषी अवजारे प्रदर्शन भरवण्यात आले होते. यावेळी येथे शेतकरी मेळावाही पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्पाच्‍या वतीने करण्यात आले.

या कार्यक्रमास शेतकऱ्यांसह कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात कुलगुरूंसह कृषी शास्त्रज्ञ आणि संशोधकांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, उद्घाटनपर भाषणात बोलताना कुलगुरू डॉ. अशोक ढवण म्हणाले, वाढती शेतमजुरी आणि हंगामात मजुरांची कमतरता यामुळे पीक लागवडीचा एकूण खर्च वाढत आहे. त्यामुळे कृषी यांत्रिकीकरणाला पर्याय नाही. मात्र, अल्‍पभूधारक, मध्‍यम आणि मोठे भूधारक शेतकरी यांची कृषी अवजारे आणि यंत्राची गरज वेगवेगळी आहे. कृषी यांत्रिकीकरणामुळे पीक लागवडीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांच्‍या आर्थिक परिस्थितीत सुधारणा करणे शक्‍य आहे. कृषी यांत्रिकीकरणाकरिता कृषी यंत्र उद्योजक, शेतकरी आणि कृषी अभियंते यांच्यात समन्‍वयाची आवश्‍यकता असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

कृषी अवजारांचे प्रदर्शन

संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ प्रदिप इंगोले, विद्यापीठ अभियंता डॉ अशोक कडाळे, परभणी आत्माचे प्रकल्प संचालक श्री. के. आर. सराफ, प्राचार्य डॉ.धर्मराज गोखले, प्राचार्य डॉ.यु एम खोडके, तालुका कृषी अधिकारी पी. बी. बनसावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. संशोधन संचालक डॉ.दत्तप्रसाद वासकर यांनी शेतकऱ्यांच्या आणि विद्यापीठ शास्त्रज्ञांच्या समन्वयातून कृषी यांत्रिकीकरणाची चळवळ गतिमान झाली पाहिजे, असे सांगितले. तर शेतकऱ्यांनी गटशेतीच्‍या माध्‍यमातून कृषी यांत्रिकीकरण बळकट करून उन्नतीसाधावी असे मत आत्मा प्रकल्प संचालक के. आर. सराफ यांनी व्यक्त केले.

यावेळी विद्यापीठातील उर्जा उद्यानामध्ये आयोजित सुधारित कृषी अवजारे, अपारंपारिक उर्जा साधनांचे प्रदर्शन आणि प्रात्यक्षिकांचे उद्घाटनही कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक पशुशक्तीचा योग्य वापर प्रकल्‍पाच्‍या संशोधन अभियंता प्रा. स्मिता सोलंकी यांनी केले. तर तांत्रिक सत्रात सेंद्रीय शेती, रेशीम उद्योग, पशुधनसंगोपन, अपारंपारिक उर्जा स्त्रोत आदींविषयावर सी.बी लटपटे, डॉ अे. के. गोरे, डॉ डी. एस. चव्हाण, डॉ. आर. टी. रामटेके आदींनी मार्गदर्शन केले.

"बहुउपयोगी सौर ऊर्जा अवजारे"

कृषी अवजारे प्रदर्शनात विद्यापीठाने निर्माण केलेल्या विविध अवजारांची मांडणी केली होती. यात ट्रॅक्टरचलीत अवजारे, सौरचलीत अवजारे, सुधारीत बैलचलीत अवजारांच्या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करण्यात आले. त्यांचा वापर, आणि उपयोगितेबाबत प्रकल्‍पाच्‍या संशोधन अभियंता प्रा. स्मिता सोलंकी यांनी माहिती दिली.

undefined

परभणी कृषि विद्यापीठ पशू अवजार प्रदर्शन vis
news send on mail, pls see
slug:-
MH_parbhani_vnmkv_melava_pradarshan_29_feb_2019_giriraj
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.