ETV Bharat / state

आता तुमच्याच शब्दात सांगतोय, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजाराची मदत द्या - रावसाहेब दानवे

सप्टेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यात तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज रविवारी भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे परभणी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. परभणी तालुक्यातील दैठणा येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला.

union minister raosaheb danve statement against cm uddhav thackeray on Indemnity in parbhani
आता तुमच्याच शब्दात सांगतोय, शेतकऱ्यांना सरसकट 50 हजाराची मदत द्या - रावसाहेब दानवे
author img

By

Published : Oct 3, 2021, 4:53 PM IST

Updated : Oct 3, 2021, 5:19 PM IST

परभणी - मागच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद जिल्ह्याचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे, कशाला करता पंचनामे, काय लावला पंचनामा ? असा सवाल करत शेतकऱ्यांना सरसकट 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्या, अशी मागणी केली होती. आता नशिबाने तेच मुख्यमंत्री आहेत'. त्यामुळे त्यांच्याच शब्दात त्यांना सांगतोय, की आता तुम्ही वाट बघू नका, पंचनामे न करता शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये सरसकट मदत द्या, अशी मागणी भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.

शेतकऱ्यांना सरसकट 50 हजाराची मदत द्या - रावसाहेब दानवे

शेतकऱ्यांशी साधला संवाद -

मागील सप्टेंबर महिन्यात परभणी जिल्ह्यात तीन वेळा अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आज रविवारी भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे परभणी जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले आहेत. परभणी तालुक्यातील दैठणा येथे नुकसानग्रस्त शेतीची पाहणी झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माजी आमदार मोहन फड, भाजपा जिल्हाध्यक्ष सुभाष कदम, आनंद भरोसे, सुरेश भुमरे, रामराव वडकुते, रबदडे आदींसह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

'मदत न मिळाल्यास शेतकरी रब्बीची पेरणी करू शकत नाही - '

मराठवाड्यात तीन टप्प्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात जेव्हा पाऊस पडला त्याचवेळी शासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यायला पाहिजे होती. मात्र, अद्याप मदत मिळालेले नाही. आता तिसऱ्या टप्प्यात देखील पाऊस झाला, हा पाऊस इतका भयानक होता की, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक देखील वाया गेले. त्यामुळे आता जर शासनाने शेतकऱ्यांना वेळीच मदत केली नाही, तर शेतकरी रब्बीची पेरणी करू शकत नाही, एवढी वाईट परिस्थिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांची असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले.

'खरडून गेलेल्या जमिनीचे वेगळे पंचनामे करून मदत द्यायला पाहिजे'

मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे. या पावसात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर झालेच आहे. मात्र, या शिवाय अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. त्यामुळे सरसकट मदतीशिवाय खरडून गेलेल्या जमिनींचा वेगळा पंचनामा करून ती वेगळी मदत शेतकऱ्यांना द्यायला पाहिजे, तसेच खरिपासाठी घेतलेले कर्ज संपूर्ण माफ करा, अशी देखील मागणी आपण शासनाकडे करणार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - "राजा शेतकरी रडला"... पावसाने शेतकरी बेहाल, पोलिसाचं ह्रदय पिळवटणारं गाणं व्हायरल

Last Updated : Oct 3, 2021, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.