परभणी - अवकाळी तथा परतीच्या पावसाने शेतातील पिकांची केलेली नासाडी आणि त्यातून शेतकऱ्यांवर संकट ओढावले आहे. यांची व्यथा परभणी तालुक्यातील मिरखोल गावचे शेतकरी उमेश देशमुख यांनी आपल्या कवितेतून मांडली आहे.
(सोमवारी) त्यांच्या कवितेचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यांनी आपल्या कवितेत शेतकऱ्याची सद्यपरस्थिती मांडली आहे. शेतामधील सडलेले सोयाबीनचे पीक आणि शेतात साचलेले अवकाळी पावसाचे पाणी शेतकऱ्यांच्या हातून गेलेले संपूर्ण खरीप स्पष्टपणे दाखवत आहे.
उमेश देशमुख यांच्याकडे मिरखेल परिसरात चार एकर शेती असून त्यांनी संपूर्ण शेतात सोयाबीनचे पीक घेतले होते. मात्र, दिवाळीपूर्वी कापून ठेवलेल्या सोयाबीनचे पीक अवकाळी पावसात अक्षरशः सडून गेल्याचे त्यांनी सांगितले.