ETV Bharat / state

परभणीत आज 2 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू..! बळींची संख्या 28 वर; एकूण 575 बाधित - कोविड रुग्ण परभणी

जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 28 झाली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात परभणी जिल्ह्यात 13 नव्या रुग्णांची भर पडली आहे.

परभणी कोरोना अपडेट
परभणी कोरोना अपडेट
author img

By

Published : Jul 30, 2020, 3:46 PM IST

परभणी - येथील जिल्हा रुग्णालयातील संसर्गजन्य कक्षात आज (गुरुवार) परभणी तालुक्यातील साडेगावच्या एका 55 वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर काही वेळातच शहरातील एका खासगी रुग्णालयात गंगाखेडच्या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.

त्यानुसार जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 28 झाली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात परभणी जिल्ह्यात 13 नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या 575 झाली असून, 269 जण कोरोनामुक्त झाल्याने उर्वरित 278 जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

परभणीच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 55 वर्षीय पुरुष रुग्णाचा पहाटेच्या सुमारास मृत्यू झाला. ते परभणी तालुक्यातील साडेगाव येथील रहिवासी होते. त्यांना काल 29 जुलै रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्यांना संसर्गजन्य कक्षात ठेवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

त्यांच्या स्वॅबचा अहवाल बुधवारी रात्री उशिराच्या अहवालात आला नव्हता. तसेच आजही (गुरुवार) दुपारपर्यंत देखील त्यांचा अहवाल आला नसल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.

दरम्यान, या रुग्णास इतर काही आजार असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर काही वेळातच गंगाखेड येथील 32 वर्षीय तरुणाचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला. तो गंगाखेड शहरातील जैदीपुरा भागातील रहिवासी असून, त्याला त्रास होत असल्याने परभणीच्या चिरायु रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हा त्या रुग्णात कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या दोन कोरोना बाधितांच्या मृत्यूमुळे परभणी जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या आता 28 एवढी झाली आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासात जिल्ह्यात नव्या 13 रुग्णांची भर पडली आहे. परभणी शहरातील दत्तनगर येथे 35 वर्षीय पुरूष, वडगल्लीतील 32 वर्षीय पुरूष, आसमानगंज भागातील 30 वर्षीय पुरूष, आझाद नगरातील 42 वर्षीय पुरूष, परभणी तालुक्यातील आरळ येथील 2 महिन्याचे बाळ, पूर्णा शहरातील शिवाजीनगरातील 41 वर्षीय पुरूष, आनंदनगरातील 30 वर्षीय महिला, सिध्दार्थ नगरातील 70 वर्षीय पुरूष, अंबिका नगरातील 65 व 35 वर्षीय महिला, 24 व 22 वर्षीय पुरुष तर गंगाखेड शहरातील दराडे नगरातील 33 वर्षीय पुरूष अशा 3 महिला व 10 पुरूष असे एकूण 13 व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत.

या 13 रुग्णांसह जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 575 रुग्ण कोरोनाबाधित आढळले असून, 269 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 28 बाधित मृत्युमुखी पडले असून रुग्णालयातील संक्रमित कक्षात 278 रुग्ण उपचार घेत आहेत.
समाधानाची बाब म्हणजे 6 रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यात परभणीतील जुनापेडगाव रोडवरील 46 वर्षीय महिला, सेलू शहरातील पारीख कॉलनी येथील 35 व 55 वर्षीय महिला, सर्वोदय नगरातील 37 व 67 वर्षीय पुरूष, गंगाखेड शहरातील योगेश्‍वर कॉलनीतील 39 पुरूष असे एकूण 3 महिला व 3 पुरूष अशा सहा जणांचा समावेश आहे.

तसेच गेल्या 24 तासात 13 बाधित तर 6 रुग्ण घरी गेले असून, नव्याने 51 संभाव्य रुग्ण देखील दाखल झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण 4 हजार 500 संशयित रुग्ण दाखल झाले असून, सध्या संसर्गजन्य कक्षात 346 व विलगीकरण कक्षात 626 जणांना ठेवण्यात आले आहे. यापूर्वी विलगीकरणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या संभाव्य रुग्णांची संख्या 3 हजार 528 एवढी आहे. एकूण 4871 संशयितांचे स्वॅब घेतले गेले असून त्यातील 4 हजार 82 स्वॅब निगेटीव्ह आले आहेत. तर 575 स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत.

125 स्वॅब अनिर्णायक असून 52 स्वॅब तपासणीस अयोग्य ठरले आहेत. 42 स्वॅबच्या अहवालाची प्रतिक्षा कायम आहे.
दरम्यान, बुधवारी संध्याकाळी गंगाखेड शहरातील खडकपुरा येथील 50 वर्षीय कोरोनाग्रस्त पुरुषाचा औरंगाबाद येथे उपचारादरम्यान खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.