ETV Bharat / state

परभणी जिल्हा बँक निवडणूक; स्वतंत्र निवडून आलेल्या 2 संचालकांच्या हातात सत्तेच्या चाव्या

परभणी जिल्हा बँकेअंतर्गत सेवा सहकारी मतदारसंघातील 7 जागा यापूर्वी बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यात भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार तानाजी मुटकुळे, भगवान सानप या बोर्डीकर गटाच्या 4 जागांचा समावेश आहे.

Parbhani district bank election
परभणी जिल्हा बँक निवडणूक
author img

By

Published : Mar 23, 2021, 6:41 PM IST

Updated : Mar 23, 2021, 7:17 PM IST

परभणी - परभणी जिल्हा बँकेच्या सत्तेच्या चाव्या आता दोन स्वतंत्र निवडून आलेल्या संचालकांच्या हातात आल्या आहेत. आज (मंगळवारी) पार पडलेल्या मतमोजणीनंतर काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर यांच्या पॅनेलने 21 पैकी 10 जागांवर विजय मिळविला आहे. तर भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या पॅनलने 9 जागांवर विजय मिळवला आहे.

स्वतंत्रपणे निवडून आलेल्या गणेशराव रोकडे आणि बालाजी देसाई या दोन उमेदवारांचा कल ज्या पॅनलकडे असेल त्यांची सत्ता जिल्हा बँकेत येणाऱ्या काळात पाहायला मिळणार आहे. दरम्यान, हे दोन्ही स्वतंत्र निवडून आलेले संचालक भाजपमध्ये असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र पक्षीय राजकारण चालत नाही. येथे हितसंबंधांवर निर्णय घेतले जातात. त्यामुळे हे संचालक आता काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

परभणी जिल्हा बँक निवडणूक

हेही वाचा-कर्जफेडीवरील मुदतवाढीला ३१ ऑगस्ट २०२० पेक्षा जास्त वाढ नाही -सर्वोच्च न्यायालय

7 बिनविरोध; 14 जणांचा मतदानांच्या माध्यमातून विजय -

परभणी जिल्हा बँकेअंतर्गत सेवा सहकारी मतदारसंघातील 7 जागा यापूर्वी बिनविरोध निवडून आल्या आहेत. त्यात भाजपचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार तानाजी मुटकुळे, भगवान सानप या बोर्डीकर गटाच्या 4 जागांचा समावेश आहे. तर हिंगोलीतील ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील गोरेगावकर, मानवतचे पंडीतराव चोखट या वरपुडकर गटाच्या 2 जणांचा तर स्वतंत्रपणे उभे राहिलेल्या पूर्णा बाजार समितीचे सभापती बालाजी देसाई अशा एकूण 7 जागांचा समावेश आहे. त्यामुळे 21 पैकी 14 जागांकरिता निवडणुका झाल्या आहेत. त्यात वरपुडकर गटाने 14 पैकी 8 जागा तर बोर्डीकर गटाने 5 जागा पटकाविल्या आहेत. तसेच गणेशराव रोकडे हे छत्री या निवडणूक चिन्हावर स्वतंत्रपणे निवडून आले आहेत.

हेही वाचा-मारुतीनंतर निस्सानही वाहनांच्या वाढविणार किमती

काही जणांचा अपेक्षेप्रमाणे विजय तर काहींना पराभवाचा धक्का -

जिल्हा बँकेच्या कृषी पणन संस्था व शेतमाल प्रक्रिया मतदारसंघात काँग्रेसचे माजी आमदार सुरेश देशमुख यांनी अपेक्षेप्रमाणे विजय मिळविला आहे . देशमुख यांना 43 तर त्यांचे प्रतिस्पर्धी बाळासाहेब निरस यांना 26 मते मिळाली आहेत. देशमुख यांनी एकतर्फी विजय मिळविला. तर विद्यमान संचालक तथा इतर शेती संस्था मतदारसंघातून नशीब अजमावणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजय जामकर यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. येथून भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी विजय मिळवत जिल्हा बँकेच्या राजकारणात प्रवेश केला. जामकर 243 व भरोसे यांना 265 मते मिळाली आहेत. तर पाच मते बाद झाली.

महिला राखीव मतदारसंघातून आमदार वरपूडकरांच्या स्नुषा प्रेरणा समशेर वरपुडकर व माजी आमदार बोर्डीकरांच्या कन्या भावना कदम-बोर्डीकर या दोघी विजयी झाल्या आहेत. प्रेरणा वरपुडकर यांना 857, भावना कदम बोर्डीकर 845 मते मिळाली आहेत. त्यांच्या विरोधात उभे राहिलेल्या अनुक्रमे रुपाली राजेश पाटील गोरेगावकर यांना 699 व डॉ. विद्या कालीदास चौधरी यांनी 559 मते मिळविता आली आहेत. या मतदारसंघात वरपुडकर व बोर्डीकर यांच्या गटाने प्रत्येकी एक जागा पटकावली.

हेही वाचा-सोन्याच्या दरात प्रति तोळा ११६ रुपयांची वाढ; चांदीच्या दरात घसरण

दत्तात्रय मायंदळे यांचा ईश्वर-चिठ्ठीतून विजय -

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मतदारसंघात शिवसेनेचे अतुल सरोदे यांनी 843 मते घेऊन एकतर्फी विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवाजी मव्हाळे यांना 685 मते मिळाली आहेत. सरोदे हे खासदार संजय (बंडू) जाधव यांचे कट्टर समर्थक आहेत. ते वरपुडकर गटाकडून रिंगणात होते. विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागासप्रवर्ग मतदारसंघात अ‍ॅड. स्वराजसिंह परिहार व त्यांचे प्रतिस्पर्धी दत्तात्रय रामभाऊ मायंदळे यांना समप्रमाणात मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी फेर मतमोजणीचा निर्णय घेतला. त्यातही समसमान मते मिळाली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी अखेर चिठ्ठी काढण्याचा निर्णय घेतला. त्यात अ‍ॅड. परिहार यांना नशिबाने हुलकावणी दिली. दत्ता मायंदळे हे चिठ्ठीतून विजयी ठरले आहेत. दत्ता मायंदळे हे आमदार बाबाजानी दुर्राणी यांचे कट्टर समर्थक आहेत. ते बोर्डीकर गटाचे मानले जात आहेत. इतर मागास प्रवर्ग मतदारसंघात काँग्रेसचे उपमहापौर भगवानराव वाघमारे यांनी बाजी मारली. त्यांनी प्रतिस्पर्धी प्रल्हादराव चिंचाणे यांचा पराभव केला. वाघमारे यांना 813 व चिंचाणे 716 यांना मते मिळाली आहेत. वाघमारे हे वरपुडकर गटाचे आहेत.

अटीतटीच्या लढतीत राजेश विटकेरांचा विजय -

परभणीतून आमदार वरपुडकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी दत्ता गोंधळकर यांचा दारुण पराभव केला. वरपुडकर यांना 87 तर गोंधळकर यांना केवळ 6 मते मिळाली आहेत. आमदार आमदार राजू नवघरे यांनी वसमतमधून त्यांचे प्रतिस्पर्धी सविता नादरे यांचा पराभव केला. नवघरे यांना 67 तर नादरे यांना केवळ नऊ मते मिळाली आहेत. पालममधून भाजपचे ज्येष्ठ नेते गणेशराव रोकडे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शेकापचे ज्येष्ठ नेते तथा विद्यमान संचालक लक्ष्मणराव गोळेगावकर यांचा दारुण पराभव केला. रोकडे यांना 35, दुधाटे यांना 16 तर नारायण शिंदे यांन 13 मते मिळाली आहेत. औंढा नागनाथ सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून राजेश पाटील गोरेगावकर यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी शेषराव कदम यांचा पराभव केला. गोरेगावकर यांना 34 तर कदम यांना 28 मते मिळाली आहेत.

सेलू सहकारी संस्था मतदारसंघात विद्यमान आमदार मेघना साकोरे- बोर्डीकर यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी वर्षा लहाने यांचा पराभव केला. मेघाना यांना 33 व लहाने यांना 15 मते मिळाली आहेत. कळमनुरी मतदारसंघातून माजी खासदार अ‍ॅड. शिवाजीराव माने यांनी विजय मिळविला. त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश वडगावकर यांचा पराभव केला. माने यांना 46 तर वडगावकर यांना 39 मते मिळाली आहेत. सोनपेठमधून अटीतटीच्या लढतीत राजेश विटकेर यांनी गंगाधर कदम बोर्डीकर यांचा पराभव केला आहे. विटेकर यांना 19 तर गंगाधर बोर्डीकर यांना 18 मते मिळाली आहेत. केवळ एका मताने विटेकर यांचा विजय झाला. सोनपेठ येथे मतदानाच्या वेळी भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलाच राडा झाला होता. मतदान केंद्रावर दगडफेकीची घटना घडल्यानंतर तणाव परिस्थिती निर्माण झाली होती.

स्वतंत्रपणे निवडून आलेल्या संचालकांच्या भूमिकेकडे लक्ष -

दरम्यान, जिल्हा बँकेच्या सेवा सहकारी संस्था मतदारसंघात काँग्रेसच्या वरपुडकर गटाने मोठी बाजी मारली आहे. त्यात वरपुडकर, राजेश विटेकर, आमदार नवघरे, राजेश पाटील गोरेगावकर हे तिघे तसेच यापूर्वी बिनविरोध निवडून आलेले साहेबराव पाटील-गोरेगावकर, पंडीतराव चोखट हे दोघे असे एकूण 5 निवडून आले. तर भाजपच्या बोर्डीकर गटाचे स्वतः बोर्डीकर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार बाबाजानी दुर्राणी व भगवान सानप हे चौघे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.

आमदार मेघना बोर्डीकर व माजी खासदार अ‍ॅड. शिवाजी माने निवडून आले आहेत. एकूणच निवडणुकीतील निकालाप्रमाणे नवनिर्वाचित सदस्यात 10 संचालक वरपुडकर गटाचे आहेत. तर 9 संचालक बोर्डीकर गटाचे आहेत. या व्यतिरीक्त भाजपचे नेते तथा स्वतंत्र निवडणूक वाढवणारे गणेशराव रोकडे व बालाजी देसाई निवडून आले आहेत. मात्र, या दोघांच्या भूमिकेबाबत मोठा संभ्रम आहे. त्यामुळे या दोघांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असून, ते काय भूमिका घेतात, यावरच परभणी जिल्हा बँकेत वरपुडकर किंवा बोर्डीकर गटाच्या पॅनलची सत्ता प्रस्थापित होणार आहे, हे निश्चित आहे.

दोन्ही पॅनलचा विजयाचा दावा -

महत्त्वाचे म्हणजे जिल्हा बँकेत आमनेसामने उभ्या ठाकलेल्या दोन्ही पॅनलकडून आमची सत्ता येणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, वरील स्वतंत्र निवडून आलेले उमेदवार ज्यांच्या गळाला लागणार, त्यांचीच सत्ता येणार आहे. त्यानंतरच वरपुडकर किंवा बोर्डीकर गटाचा दावा खरा ठरणार आहे.

Last Updated : Mar 23, 2021, 7:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.