ETV Bharat / state

सत्ता कोणाचीही आली तरी सरकार आमचेच - सुप्रिया सुळे - परभणी संवाद यात्रा

संवाद यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या महाराष्ट्र दौर्‍यावर फिरत आहेत. याअंतर्गत त्यांनी आज (सोमवारी) हिंगोली आणि वसमत येथे संवाद कार्यक्रम आटोपून सायंकाळी परभणीत पत्रकार परिषद घेतली.

सुप्रिया सुळे
author img

By

Published : Sep 9, 2019, 8:53 PM IST

परभणी - सध्या राष्ट्रवादीच्या लोकांना ईडी, सीबीआय, बँक कर्ज आणि कारखाने या 4 गोष्टींची भीती दाखवून भाजप पक्षामध्ये नेत आहे. त्याचवेळी भाजप त्यांना कॅबिनेट मंत्री, पालकमंत्री पद देऊ, असे सांगत आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे 20-25 नेते मंत्री आणि पालकमंत्री बनणार असतील, तर सत्ता कोणाचीही आली तरी सरकार आमचेच असणार आहे, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज परभणीत केले.

खासदार सुप्रिया सुळे

हेही वाचा - रायगडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, अवधूत तटकरे आज बांधणार शिवबंधन

संवाद यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या महाराष्ट्र दौर्‍यावर फिरत आहेत. याअंतर्गत त्यांनी आज (सोमवारी) हिंगोली आणि वसमत येथे संवाद कार्यक्रम आटोपून सायंकाळी परभणीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी, राजेश विटेकर, सोनाली देशमुख, भावना नखाते, प्रा. किरण सोनटक्के आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपच्या चुकीच्या धोरणामुळे मंदीची लाट आली आहे. जीएसटी, नोटाबंदी हेच मंदीचे प्रमुख कारण आहे. याबाबत देशाचे माजी पंतप्रधान तथा अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे त्या वेळी सांगत होते. परंतु, कोणाला त्यावर विश्वास बसत नव्हता. मात्र, आज त्या धोरणांचा फटका बसत असताना सर्वांना मनमोहन सिंग यांची गोष्ट पटू लागली आहे.

हेही वाचा - देशात मंदी असल्याचे उध्दव ठाकरेंनी केले मान्य; तरीही, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची घोषणा

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात एक लेख आला आहे. त्यात मंदिबाबत भाजपने आता अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांचा सल्ला घ्यायला हवा, असे म्हटले आहे. मंदी आली याचे कारण शोधण्याचे आणि ती दूर करण्याचे काम वाणिज्य मंत्रालयाचे आहे. मात्र, सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडे तसे कुठलेही धोरण नसल्याचा आरोप देखील सुळे यांनी केला आहे.

जाहिरातीतून शिवसेना गायब -

सध्या टीव्हीवर राज्य सरकारच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती येत आहेत. मात्र, या जाहिरातीत शिवसेनेच्या कुठल्याच नेत्याचा फोटो नाही. सेनेचेही 5 वर्षे सरकारमध्ये योगदान आहे ना? मग त्यांना का डावलल जाते. फक्त मुख्यमंत्र्यांचा फोटो का? असा सवाल सुळे यांनी केला आहे.

Intro:परभणी - सध्या राष्ट्रवादीच्या लोकांना ईडी, सीबीआय, बँक कर्ज आणि कारखाने या चार गोष्टींची भीती दाखवून भाजप त्यांच्याकडे नेत आहे. याचवेळी भाजप त्यांना कॅबिनेट मंत्री बनवू, शिवाय पालकमंत्रीपद देऊ, असा सांगत आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वीस-पंचवीस नेते मंत्री आणि पालकमंत्री बनणार असतील तर सत्ता कोणाचीही आली तरी सरकार आमचे होणार, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज परभणीत करून एक गोंधळाचे वातावरण निर्माण केले आहे. Body: संवाद यात्रेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या महाराष्ट्र दौर्‍यावर फिरत आहेत. याअंतर्गत त्यांनी आज (सोमवारी) हिंगोली आणि वसमत येथे संवाद कार्यक्रम आटोपून सायंकाळी परभणीत पत्रकार परिषदे घेतली. यावेळी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्रानी, राजेश विटेकर, सोनाली देशमुख, भावना नखाते, प्रा. किरण सोनटक्के आदी उपस्थित होते. पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भाजपचा चुकीच्या धोरणामुळे मंदीची लाट आली आहे. जीएसटी, नोटाबंदी हेच मंदीचे प्रमुख कारण आहे. याबाबत देशाचे माजी पंतप्रधान तथा अर्थशास्त्रज्ञ डॉ. मनमोहन सिंग हे त्या वेळी सांगत होते; परंतु कोणाला त्यावर विश्वास बसत नव्हता. मात्र आज त्या धोरणांचा फटका बसत असताना सर्वांना डॉ. मनमोहन सिंग यांची गोष्ट पटू लागली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना चा यावर एक लेख आला आहे. त्यात मंदिबाबत भाजपने आता अर्थशास्त्रज्ञ मनमोहन सिंग यांचा सल्ला घ्यायला हवा, असे म्हटले आहे. मंदी आली याचे कारण शोधण्याचे आणि ती दूर करण्याचे काम वाणिज्य मंत्रालयाचे आहे. मात्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाकडे तसे कुठलेही धोरण नसल्याचा आरोप देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला

"जाहिरातीतून शिवसेना गायब"

सध्या टीव्हीवर राज्य सरकारच्या मोठ्या प्रमाणात जाहिरात येत आहेत. मात्र या जाहिरातीत शिवसेनेच्या कुठल्याच नेत्याचा फोटो नाही, सेनेचेही पाच वर्षे सरकारमध्ये योगदान आहे ना ? मग त्यांना का डावळलं जातं. फक्त मुख्यमंत्र्यांचा फोटो का ? असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी यावेळी भाजप चे हे बरोबर नाही, असा टोलाही लगावला.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- press vis & byte 1, 2, 3 Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.