ETV Bharat / state

धर्मापुरीत विद्यार्थ्याची तर बरबडी शिवारात व्हेटरनरी डॉक्टरची आत्महत्या

परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथे एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसरीकडे पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरबडी शिवारात 23 वर्षीय व्हेटरनरी (पशुवैद्यक) डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली.

doctor & student suicide
doctor & student suicide
author img

By

Published : Mar 9, 2021, 3:35 PM IST

परभणी - सातत्याने लॉकडाऊन लागत असल्याने आपल्या शिक्षणाचे काय होईल, या विवंचनेत परभणी तालुक्यातील धर्मापुरी येथे एका 20 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर दुसरीकडे पूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरबडी शिवारात 23 वर्षीय व्हेटरनरी (पशुवैद्यक) डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान, सदर डॉक्टरच्या आत्महत्येमागचे कारण मात्र, अजून स्पष्ट झाले नाही.

शिक्षणाचे पुढे काय, या विवंचनेत गळफास

शुभम गंगाधर उगले (20, रा. धर्मापुरी, ता. परभणी) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो बी. ए. प्रथम वर्षात परभणीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन होत आहे. त्यामुळे शाळा-महाविद्यालये बंद आहेत. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणात होत आहे. शिक्षणाचे पुढे काय होणार, या विवंचनेत असलेल्या शुभम उगले याने राहत्या घरी छताच्या पंख्यास साडी बाधून गळफास घेत काल (सोमवारी) सायंकाळी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेभाऊ चव्हाण, फौजदार काझी, कर्मचारी सुभाष चव्हाण यांच्यासह आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी परभणीच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास सुभाष चव्हाण हे करत आहेत.

शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेत डॉक्टरची आत्महत्या

पूर्णा तालुक्यातील बरबडी शिवारात 23 वर्षीय व्हेटरनरी डॉक्टरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (मंगळवारी) सकाळी साडेआठच्या सुमारास उघडकीस आली. अशोक प्रकाश गायकवाड (वय 23) असे या डॉक्टरचे नाव असून ते बरबडी येथे व्हेटरनरी डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांनी बरबडी शिवारातील एका शेतातील लिंबाच्या झाडास गळफास लावला. या घटनेबाबत युवराज कांबळे यांनी पूर्णा पोलीस ठाण्यास माहिती दिली. त्यानुसार काल (सोमवारी) रात्री साडेसातच्या सुमारास डॉ. अशोक गायकवाड हे घराबाहेर पडले. मात्र, रात्री घरी आलेच नाहीत. तर मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांनी शेतातील लिंबाच्या झाडास दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. मात्र डॉक्टरांच्या आत्महत्येमागील कारण अजून स्पष्ट झाले नसून, याप्रकरणी पूर्णा पोलिसांनी सध्या अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास कर्मचारी नळगीर कर करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.