ETV Bharat / state

#COVID 19 : कोरोनापासून बचावासाठी परभणीच्या बाजारपेठेत 'सोशल-डिस्टन्सींग'चा प्रयोग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परभणीतील बाजारपेठा, बँकांसमोर सोशन डिस्टन्सींगसाठी आखणी करण्यात आली आहे.

सुरक्षीत अंतर
सुरक्षीत अंतर
author img

By

Published : Mar 26, 2020, 1:18 PM IST

परभणी - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन, प्रशासन तसेच नागरिकांकडून देखील विविध प्रयोग होत आहेत. या अंतर्गत 'सोशल-डिस्टंसींग'चा अवलंब करण्यासाठी परभणी बाजारपेठेत एक मीटर अंतरावर आखणी करून देण्यात आली आहे. शहरातील भाजीमंडई, विविध ठिकाणच्या किराणा दुकान तसेच मेडिकल आणि बँकांसमोर ही आखणी केल्याचे दिसून येत आहे. नागरिकही शिस्तीत या आखणीमध्ये उभे राहून आवश्यक त्या गोष्टी खरेदी करताना दिसत आहेत.

'सोशल-डिस्टन्सींग'चा प्रयोग

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात 21 दिवसांचे लॉकडाऊन सुरू झाले आहे. या काळात नागरिकांना भाजीपालासह इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासनाने उपाययोजना केल्या आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात भाजीपाला, अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहेत. किराणा दुकानांसमोर ग्राहकांची गर्दी होवू नये, यासाठी जनतेला सोशल डिस्टन्सींगचे महत्व पटवून दिले जात आहे.

शहरातील गांधी पार्क, शिवाजी चौक, सुभाष रोड, शिवाजी रोड तसेच वसमत रोडवरील काळीकमान आणि क्रांती चौकातील भाजीमंडई आदी ठिकाणच्या दुकानासमोर ठराविक अंतरावर ग्राहकांनी शिस्तीत थांबून आपल्या सामानाची खरेदी करत आहेत. यासाठी 1 मीटर अंतरावर आखणी करून सामानाची खरेदी केली जात आहे. तसेच शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ बडोदा, आंध्रा बँक, पंजाब नॅशनल बँक आदी महत्त्वाच्या बँकांबाहेर देखील गर्दी होत असल्याने त्या ठिकाणीही आखणी करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका व आरोग्य विभागामार्फत वारंवार दुकानदार आणि ग्राहकांना सुचना देण्यात येत आहेत. तसेच जीवनावश्यक वस्तुंचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध असून नागरिकांनी खरेदी करण्यासाठी दुकानांवर गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा - कोरोनाला रोखण्यासाठी महापालिकेकडून शहरात निर्जंतुकीकरण सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.