ETV Bharat / state

परभणीत अवकाळी पावसामुळे फळबागांना फटका - परभणीत अवकाळी पाऊस फळबागांना फटका

परभणी शहरात आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दहा मिनिटाने या पावसाने जोर पकडला. त्यानंतर अर्धा तास सततधार झालेल्या या पावसामुळे परभणी शहरात सर्व रस्ते जलमय झाले होते.

parbhani rain
परभणीत पावसाची पाऊस सुरू
author img

By

Published : Feb 2, 2020, 9:07 PM IST

परभणी - शहरामध्ये सायंकाळी 7 वाजल्यापासून अचानक पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यम स्वरूपाच्या या पावसामुळे शहरातील सर्व रस्ते जलमय झाले आहेत. या अवकाळी पावसामुळे फळबागांना फटका बसण्याची शक्यता असून, यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, शहरात तुरुतपीर बाबांची उर्स यात्रा आजपासून भरली आहे. त्या ठिकाणी आलेल्या व्यापारी आणि भाविकांची या पावसाने धांदल उडाली.

परभणीत पावसाची पाऊस सुरू

हेही वाचा - गड-किल्ल्यांवर दारू पिणाऱ्यांची खैर नाही, गृह खात्याचा नवा निर्णय

परभणी शहरात आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दहा मिनिटाने या पावसाने जोर पकडला. त्यानंतर अर्धा तास सततधार झालेल्या या पावसामुळे परभणी शहरात सर्व रस्ते जलमय झाले होते. नाल्या ओसंडून वाहत होत्या. ज्यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम झाला असून, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. तर बाजारात आलेल्या लोकांनी तत्काळ घराचा रस्ता पकडला. याशिवाय परभणी शहरातील तुराबुल हक दर्गेत तुरुतुपीर बाबा ची यात्रा आजच भरण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी पावसामुळे धांदल उडाली आहे. व्यापारी आणि दर्शनासाठी आलेल्या लोकांची त्रेधातिरपीट झाली असून याचा परिणाम यात्रेवर झाल्याचे दिसून आले. दरम्यान, आभाळ दाटून आलेले होते, त्यामुळे पुन्हा रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त होत होती.

हेही वाचा - 'हिरोईन म्हणजे नायिका', बबनराव लोणीकरांनी केले स्वत:च्या वक्तव्याचे समर्थन

Intro:परभणी - परभणीत सायंकाळी 7 वाजल्यापासून अचानक पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यम स्वरूपाच्या या पावसामुळे शहरातील सर्व रस्ते जलमय झाले आहेत. या अवकाळी पावसामुळे फळबागांना फटका बसण्याची शक्यता असून यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, शहरात तुरुतपीर बाबांची उर्स यात्रा आजपासून भरली आहे. त्या ठिकाणी आलेल्या व्यापारी आणि भाविकांची या पावसाने धांदल उडाली.Body: परभणी शहरात आज सायंकाळी सात वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर दहा मिनिटाने या पावसाने जोर पकडला. त्यानंतर अर्धा तास सततधार झालेल्या या पावसामुळे परभणी शहरात सर्व रस्ते जलमय झाले होते. नाल्या ओसंडून वाहत होत्या. ज्यामुळे बाजारपेठेवर याचा परिणाम झाला असून, व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. तर बाजारात आलेल्या लोकांनी तात्काळ घराचा रस्ता पकडला. याशिवाय परभणी शहरातील तुराबुल हक दर्गेत तुरुतुपीर बाबा ची यात्रा आजच भरण्यास सुरुवात झाली. या ठिकाणी पावसामुळे धांदल उडाली आहे. व्यापारी आणि दर्शनासाठी आलेल्या लोकांची त्रेधातिरपीट झाली असून याचा परिणाम यात्रेवर झाल्याचे दिसून आले. दरम्यान, आभाळ दाटून आलेले होते, त्यामुळे पुन्हा रात्रीतून पाऊस पडण्याची शक्यताही व्यक्त होत होती.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_rain_vis_2-2-20Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.