ETV Bharat / state

परभणी लोकसभेवर सातव्यांदा 'भगवा' फडकला; मात्र, अद्याप मंत्रीपदाची 'पाटी' रिकामीच

परभणीने 1989 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रथम खासदार दिला. त्यामुळे शिवसेनेला पक्षाची मान्यता मिळून 'धनुष्यबाण' हे चिन्ह मिळाले. त्यावेळेपासून आजपर्यंत परभणी लोकसभेवरील शिवसेनेचा 'भगवा' खाली उतरला नाही. शिवाय त्या वेळेपासून विधानसभेवर देखील शिवसेना विजय मिळवत आली आहे. मात्र, एकदाही परभणीला मंत्रीपद मिळालेले नाही. यामुळे यंदातरी खासदार संजय जाधव यांच्या रुपाने मंत्री मिळणार का? यांची चर्चा रंगली आहे.

परभणी लोकसभेवर सातव्यांदा 'भगवा' फडकला; मात्र, अद्याप मंत्रीपदाची 'पाटी' रिकामीच
author img

By

Published : May 30, 2019, 8:38 AM IST

परभणी - शिवसेनेने परभणी लोकसभेवर सातव्यांदा भगवा फडकवला आहे. उमेदवार बदलली तरी परभणीकरांनी शिवसेनेवरील निष्ठा सोडलेली नाही. मात्र, शिवनेनेकडून परभणीवर कायम अन्याय झाल्याची जनभावना व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा तरी दुसऱ्यांदा खासदार झालेल्या संजय जाधव यांची मंत्रीपदी वर्णी लागणार का? याची चर्चा रंगली आहे.

परभणी लोकसभेवर सातव्यांदा 'भगवा' फडकला; मात्र, अद्याप मंत्रीपदाची 'पाटी' रिकामीच

परभणीने 1989 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रथम खासदार दिला. त्यामुळे शिवसेनेला पक्षाची मान्यता मिळून 'धनुष्यबाण' हे चिन्ह मिळाले. त्यावेळेपासून आजपर्यंत परभणी लोकसभेवरील शिवसेनेचा 'भगवा' खाली उतरला नाही. शिवाय त्या वेळेपासून विधानसभेवर देखील शिवसेना विजय मिळवत आली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवसेना कायम जिंकत आली तरी शिवसेनेचा खासदार मात्र पक्षात राहत नाही, हा इतिहास आहे. मागच्या पाचही खासदारांनी शिवसेनेला 'राम राम' ठोकला आहे.

लोकसभा निवडणूक 2014 च्या प्रचारसभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार संजय जाधव यांना पक्ष सोडणार नाही, अशी जनतेपुढे शपथ दिली. कट्टर शिवसैनिक असलेल्या खासदार संजय जाधव यांची शिवसेनेवरील असलेली निष्ठा त्यांनी दाखवून दिली. 2019 च्या निवडणुकीत पक्षाला कुठलाही दगाफटका न करता त्यांनी कट्टर शिवसैनिक म्हणून आपले काम सुरू ठेवले. पक्षाने देखील त्यांचा सन्मान करत दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिली. त्यांनी या विश्वासाला पात्र ठरत 42 हजाराच्या मताधिक्क्याने विजय संपादन केला.

राष्ट्रवादीचे 'चक्रव्यूह' जाधव यांनी भेदलं -
निकडणुकीच्या सुरुवातीपासून 'राष्ट्रवादी'च्या विजयाची गणिते मांडली जाऊ लागली. अनेक 'एक्झिट पोल'मध्ये राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचे सांगितले जात होते. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या मागे 4 विद्यमान आमदार, 4 माजी आमदारांसह जवळपास 14 दिग्गज पुढाऱ्यांचे पाठबळ उभे होते, असे असताना केवळ शिवसैनिकांच्या जोरावर खासदार संजय जाधव यांनी 'खिंड' लढवली. थेट मतदारांना साद घालून त्यांनी विश्वास संपादन केला. मोदी लाट होतीच, मात्र त्यांनी जनतेशी दांडगा संपर्क ठेवून या निवडणुकीत यश खेचून आणले.

पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवणाऱ्या संजय जाधव यांनी निकालात बाजी मारली. त्यामुळे दुसऱ्यांदा खासदारपदी वर्णी लागलेल्या खासदार जाधव यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी, अशी अपेक्षा आता पक्ष आणि सामान्य जनतेतून ही व्यक्त होऊ लागली आहे. सोशल मीडियावर देखील याची जोरदार मागणी होत आहे. तसेच दोन वेळा आमदार आणि दुसऱ्यांदा खासदारकीचा अनुभव मिळत असलेल्या संजय जाधव यांना मंत्रीपद मिळाल्यास परभणीच्या विकासाचा 'बॅक लॉक' भरून निघेल.

सर्वात जुना जिल्हा असूनही विकासाच्या बाबतीत मागे असणाऱ्या परभणीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्रात मंत्रीपद आवश्यक आहे. दरम्यान, परभणीकरांनी वेळोवेळी आपले कर्तव्य पार पाडत शिवसेनेच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले. त्यामुळे आता शिवसेनेने आपले कर्तव्य निभावत परभणीला मंत्रिपद देऊन विश्वास सार्थकी ठरवावा, अशी अपेक्षा नागरिकामधून व्यक्त होत आहे.

Intro:परभणी - सतत सातव्यांदा परभणी लोकसभेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. माणसं बदलली तरी परभणीकरांनी शिवसेनेवरील निष्ठा सोडली नाही ; परंतु शिवसेनेकडून मात्र परभणीवर कायम अन्याय झाल्याची भावना नागरिक व्यक्त करतात. त्यातच दुसऱ्यांदा खासदार झालेल्या संजय जाधव यांची मंत्रिपदी वर्णी लागणार का ? याची चर्चा तसेच अपेक्षा देखील परभणीतून व्यक्त होत आहे.Body:परभणीने 1989 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला प्रथम खासदार दिला. त्यामुळे शिवसेनेला पक्षाची मान्यता मिळून धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले. त्यावेळेपासून आजपर्यंत परभणी लोकसभेवरील शिवसेनेचा भगवा खाली उतरला नाही. शिवाय त्यावेळेपासून विधानसभेवर देखील शिवसेना विजय मिळवता आली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शिवसेना कायम जिंकता आली तरी शिवसेनेचा खासदार मात्र पक्षात राहत नाही, हा इतिहास आहे. मागच्या पाचही खासदारांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. त्यामुळे 2014 च्या निवडणुक प्रचारसभेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विद्यमान खासदार संजय जाधव यांना पक्ष सोडणार नाही, अशी जनतेपुढे शपथ दिली. कट्टर शिवसैनिक असलेल्या खासदार संजय जाधव यांची शिवसेनेवरील असलेली निष्ठा त्यांनी दाखवून दिली. 2019 च्या निवडणुकीत पक्षाला कुठलाही दगाफटका न करता त्यांनी कट्टर शिवसैनिक म्हणून आपले काम सुरू ठेवले. पक्षाने देखील त्यांचा सन्मान करत दुसऱ्यांदा त्यांना उमेदवारी दिली. त्यांनी या विश्वासाचा मान राखत सुमारे 42 हजाराच्या मताधिक्क्याने विजय संपादन केला.
दरम्यान, सुरुवातीपासून 'राष्ट्रवादी'च्या विजयाची गणिते मांडली जाऊ लागली. अनेक एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादीचा विजय निश्चित असल्याचे सांगितले जात होते. राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांच्या मागे सुमारे चार विद्यमान आमदार, चार माजी आमदारांसह जवळपास चौदा दिग्गज पुढाऱ्यांचे पाठबळ उभे होते, असे असताना केवळ शिवसैनिकांच्या जोरावर खासदार संजय जाधव यांनी खिंड लढवली. थेट मतदारांना साद घालून त्यांनी विश्वास संपादन केला. मोदी लाट होतीच ; परंतु जनतेशी दांडगा संपर्क ठेवून त्यांनी या निवडणुकीत यश खेचून आणले. अगदी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवणाऱ्या संजय जाधव यांनी बाजी मारली. त्यामुळे दुसऱ्यांदा खासदारपदी वर्णी लागलेल्या खासदार जाधव यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडावी, अशी अपेक्षा आता पक्ष आणि सामान्य जनतेतून ही व्यक्त होऊ लागली आहे. सोशल मीडियावर देखील याची जोरदार मागणी होत आहे. तसेच दोन वेळा आमदार आणि दुसऱ्यांदा खासदारकीचा अनुभव मिळत असलेल्या संजय जाधव यांना मंत्रीपद मिळाल्यास परभणीच्या विकासाचा बॅक लॉक भरून निघेल. सर्वात जुना जिल्हा असूनही विकासाच्या बाबतीत मागे असणाऱ्या परभणीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्रात मंत्रीपद आवश्यक आहे. दरम्यान, परभणीकरांनी वेळोवेळी आपले कर्तव्य पार पाडत शिवसेनेच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले. त्यामुळे आता शिवसेनेने आपले कर्तव्य निभावत परभणीला मंत्रिपद देऊन विश्वास सार्थकी ठरवावा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- vis with voice-over
हे visuals mojo वरून
(Mh_pbn_mp_to_minister_vis) या नावाने upload केले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.