ETV Bharat / state

हजारोंवर अंत्यसंस्कार करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा शिवसेनेतर्फे सन्मान - शिवसेनेचे खासदार संजय जाधव

कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या शहरातील हजारावर बाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या महापालिकेच्या 9 योद्ध्यांचा शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी सत्कार केला आहे. या योद्ध्यांचा शाल, श्रीफळ व 11 हजार रुपये रोख देवून सन्मान करण्यात आला.

कोरोनायोद्ध्यांचा शिवसेनेतर्फे सन्मान
कोरोनायोद्ध्यांचा शिवसेनेतर्फे सन्मान
author img

By

Published : May 10, 2021, 12:06 PM IST

परभणी - कोरोनाचा संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या शहरातील हजारो बाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या महापालिकेच्या 9 योद्ध्यांचा शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांच्या वतीने रविवारी सायंकाळी सत्कार करण्यात आला. खासदार संपर्क कार्यालयासमोर आयोजीत केलेल्या या कार्यक्रमाद्वारे त्यांचे परभणीकरांच्यावतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे.

आतापर्यंत 1 हजार 40 मृतांवर अंत्यसंस्कार

दरम्यान, 'गेल्या वर्षभरापासून शहरासह जिल्ह्यातील कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींवर सर्व सोपस्कार पूर्ण करीत, अंत्यसंस्कार करणारे महापालिकेअंतर्गत रुग्णवाहिकेच्या चालकासह, 9 कोरोनायोद्धे इमानेइतबारे अहोरात्र कर्तव्य बजावत आहेत. विशेषतः हे कोरोनायोद्धे या अंत्यसंस्काराच्या प्रक्रियेत प्रशासनाने दिलेल्या सूचनांचा काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहेत. मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटूंबियांच्या भावनांचीसुध्दा दखल घेत आहेत. या संवेदनशील विषयात या योद्ध्यांनी आतापर्यंत कर्तव्यात तसूभरसुध्दा दिरंगाई केलेली नाही. तसेच तक्रारसुध्दा येवू दिली नाही. महापालिकेचे हे कोरोनायोद्धे कोणत्याही तक्रारीविना सेवा बजावित आहेत. या योद्ध्यांनी आतापर्यंत 1 हजार 40 मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत. त्यांच्या या अभूतपूर्व कामास आपण सलाम करत असल्याचे', खासदार जाधव म्हणाले.

11 हजार रुपये रोख देवून कोरोना योद्ध्यांचा सन्मान

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, आमदार डॉ.राहुल पाटील, महापालिका आयुक्त देविदास पवार, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सेनानेते गंगाप्रसाद आनेराव, प्रभाकर पाटील वाघीकर, जिल्हा बँक संचालक अतुल सरोदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या सोहळ्यात महापालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या किरण गायकवाड, शेख सलीम, गौतम उबाऴे, सुरेश भुतडे, भीमराव उबाळे, राहुल भराडे, अशोक उबाळे या योद्ध्यांचा शाल, श्रीफळ व 11 हजार रुपये रोख देवून सन्मान करण्यात आला.

योद्ध्यांच्या कार्याला सलाम

यावेळी खासदार जाधव, आमदार पाटील, जिल्हाधिकारी मुगळीकर, आयुक्त पवार यांनी या योद्ध्यांच्या कार्याला सलाम केला. आजच्या या आपत्तीत कोरोनाबाधित रुग्ण, मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या विषयी काही कुटुंबीय, नातेवाईक अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याचा घृणास्पद प्रकाराची उदाहरणे समोर येत आहेत. असे असतांना हे योध्दे कर्तव्य बजावत सेवाभाव, बांधिलकी, माणुसकीचे दर्शन घडवून समाजासमोर प्रेरणादायी यशोगाथा उभी करत आहेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - बोईसरमधील तुंगा कोरोना रुग्णालयाच्या व्यवस्थापकाला भाजपाच्या पदाधिकाऱ्याकडून मारहाण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.