ETV Bharat / state

अखेर परभणीतील स्कूल व्हॅन चालकांचा मिटला संप

परभणीच्या परिवहन खात्यातील अधिकारी वर्गाने ऑटो चालकांना व शाळा वाहनधारकांना विनाकारण वेठीस धरल्याचा आरोप येथील ऑटो तथा व्हॅन चालक संघटनेने केला आहे. शहरात जागोजागी उभे राहून स्कूल व्हॅन, ऑटोचालकांच्या विरोधात कडक कारवाई करत जप्तीचे आदेश देण्यात आल्याने सर्व ऑटोचालक आणि स्कूलव्हनधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले होते.

School van driver agitation stop
अखेर परभणीतील स्कूल व्हॅन चालकांचा मिटला संप
author img

By

Published : Dec 13, 2019, 2:44 AM IST

परभणी - गेल्या 3-4 दिवसांपासून परभणी शहरातील स्कूल व्हॅन व ऑटोचालक संघटनेने पुकारलेला बेमुदत संप आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आज गुरुवारी संध्याकाळी मिटला. आरटीओ विभागाच्या कडक धोरणाविरुद्ध संघटनेने हा संप तसेच बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र, आता कारवाई तूर्तास थांबणार असल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.

स्कूल व्हॅन चालकांचा मिटला संप

हेही वाचा - परभणीतील स्कूल व्हॅनचालकांचा 'आरटीओ' विरोधात बेमुदत बंद

परभणीच्या परिवहन खात्यातील अधिकारी वर्गाने ऑटो चालकांना व शाळा वाहनधारकांना विनाकारण वेठीस धरल्याचा आरोप येथील ऑटो तथा व्हॅन चालक संघटनेने केला आहे. शहरात जागोजागी उभे राहून स्कूल व्हॅन, ऑटोचालकांच्या विरोधात कडक कारवाई करत जप्तीचे आदेश देण्यात आल्याने सर्व ऑटोचालक आणि स्कूलव्हनधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे परभणी शहरातील सुमारे साडेतीनशे वाहनधारक आणि ऑटो चालकांनी परिवहन अधिकारी प्रशासनाच्या विरोधात बेमुदत संप पुकारला होता. त्यामुळे पालकांची त्रेधातिरपीट उडाली होती. आज आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पुढाकार घेऊन परभणी शहरातील स्कूल व्हॅन संघटना व ऑटोचालक तसेच परिवहन खात्याचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून मध्यस्थी करत हा संप अखेर मिटवला.

हेही वाचा - परभणी: बळीराजा साखर कारखान्यात अल्पवयीन कामगाराचा मशीनमध्ये अडकून मृत्यू

या बैठकीला आमदार डॉ.राहुल पाटील, परिवहन खात्याचे अधिकारी तसेच राणा एकता स्कूल वाहक संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, शिवसेना ऑटो संघटनेचे अध्यक्ष संभानाथ काळे, डॉ.विवेक नावंदर, अनिल डहाळे, संघर्ष परमीट ऑटो संघटना, संभाजी ब्रिगेड आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत परिवहन खात्याच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीस तुर्तास स्थगिती देण्यात येवून टप्या-टप्याने सर्व स्कूल वाहनधारक व ऑटोचालकांनी परामीट घेण्याचे ठरले. हा संप यशस्वीपणे मिटविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार राहुल पाटील यांचे वाहनचालकांनी आभार मानत बेमुदत संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. हा संप मिटल्यामुळे शहरातील पालकवर्गानेही सुटकेचा श्वास सोडला.

Intro:परभणी - गेल्या तीन-चार दिवसांपासून परभणी शहरातील स्कूल व्हॅन व ऑटोचालक संघटनेने पुकारलेला बेमुदत संप आमदार डॉ.राहुल पाटील यांच्या मध्यस्थीनंतर आज गुरुवारी संध्याकाळी मिटला. आरटीओ विभागाच्या कडक धोरणाविरुद्ध संघटनेने हा संप तसेच बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र आता कारवाई तूर्तास थांबणार असल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले.Body:परभणीच्या परिवहन खात्यातील अधिकारी वर्गाने ऑटो चालकांना व शाळा वाहनधारकांना विनाकारण वेठीस धरल्याचा आरोप येथील ऑटो तथा व्हॅन चालक संघटनेने केला आहे. शहरात जागोजागी उभे राहून स्कूल व्हॅन, ऑटोचालकांच्या विरोधात खडक कार्यवाही करत जप्तीचे आदेश देण्यात आल्याने सर्व ऑटोचालक आणि स्कूलव्हनधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे परभणी शहरातील सुमारे साडेतीनशे वाहनधारक आणि ऑटो चालकांनी परिवहन अधिकारी प्रशासनाच्या विरोधात बेमुदत संप पुकारला होता. त्यामुळे पालकांची त्रेधातिरपीट उडाली होती. आज आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पुढाकार घेऊन परभणी शहरातील स्कूल व्हॅन संघटना व ऑटोचालक तसेच परिवहन खात्याचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून मध्यस्थी करत हा संप अखेर मिटवला. या बैठकीला आमदार डॉ.राहुल पाटील, परिवहन खात्याचे अधिकारी तसेच राणा एकता स्कुल वाहक संघटनेचे अध्यक्ष संतोष ठाकूर, शिवसेना ऑटो संघटनेचे अध्यक्ष संभानाथ काळे, डॉ.विवेक नावंदर, अनिल डहाळे, संघर्ष परमीट ऑटो संघटना, संभाजी ब्रिगेड आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत परिवहन खात्याच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्यवाहीस तुर्तस स्थगिती देण्यात येवून टप्याटप्याने सर्व स्कुलवाहनधारक व अॕटोचालकानी परामीट घेण्याचे ठरले. हा संप यशस्वीपणे मिटविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार डाॕ.राहुल पाटील यांचे वाहनचालकांनी आभार मानत बेमुदत संप मागे घेत असल्याचे जाहीर केले. हा संप मिटल्यामुळे शहरातील पालकवर्गानेही सुटकेचा श्वास सोडला.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- photo & vis Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.