ETV Bharat / state

परभणीच्या पालममध्ये दोन युवकांतील वादानंतर जाळपोळ आणि दगडफेक - clash

पालम शहरातील तहसीलसमोर असलेल्या मुख्य चौकात या दोन गटातील तरुणांमध्ये वैयक्तिक पातळीवर वाद झाला होता. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटातील समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही जाळपोळ सुरू झाली होती.

पालममध्ये दोन युवकांतील वादानंतर जाळपोळ आणि दगडफेक झाली.
author img

By

Published : Jul 18, 2019, 6:00 AM IST

Updated : Jul 18, 2019, 6:27 AM IST

परभणी - जिल्ह्यातील पालम शहरात दोन युवकांमध्ये काही कारणातून वाद झाला. या वादाचे पर्यवसान दोन गटात दंगल भडकण्यामध्ये झाले आहे. ज्यामुळे शहरात जाळपोळ आणि दगडफेकीची घटना घडली आहे. हा प्रकार बुधवारी रात्री 7.30 ते 10 वाजेपर्यंत चालला. यानंतर शहरात पोलीसांनी शांतता प्रस्थापित केली आहे.

पालममध्ये दोन युवकांतील वादानंतर जाळपोळ आणि दगडफेक झाली.

दरम्यान, पालम शहरातील तहसीलसमोर असलेल्या मुख्य चौकात या दोन गटातील तरुणांमध्ये वैयक्तिक पातळीवर वाद झाला होता. या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. त्यानंतर दोन्ही गटातील समर्थक एकमेकांसमोर उभे ठाकल्याने ही जाळपोळ सुरू झाली होती. त्यानंतर रात्री आठ ते दहा वाजेच्या दरम्यान हा गोंधळ सुरूच राहिला. ज्यामुळे संपूर्ण बाजारपेठ बंद झाली.

दरम्यान, पालमसह गंगाखेड आणि परभणी पोलिसांची जादा कुमक पालममध्ये रात्री 9.30 वाजता दाखल झाली आहे. सध्या पोलिसांकडून शांतता प्रस्थापित करण्यात आली असून उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकृष्ण कर्डीले ठाण मांडून आहेत. तसेच संपूर्ण शहरात पोलीस जवनांसह एसआरपीचा बंदोबस्त लावण्यात आला आसला तरी शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 18, 2019, 6:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.