परभणी - महाराष्ट्रात मुस्लीम समाज वंचित आघाडी सोबत जोडला जात आहे., त्यामुळे एखादा पक्ष धर्माच्या नावाखाली मत मागत असेल तर त्याला मुस्लीम समाज यावेळी मत देईल, असे वाटत नाही, असा टोला रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी 'एमआयएम' ला लगावला.
वंचित बहुजन आघाडीच्या झेंड्याखाली सर्व आंबेडकरी जनतेने एकत्र यावे, यासाठी रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर मंगळवारी परभणीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा... 'अजून म्हातारा झालो नाही, अनेकांना घरी बसवण्यासाठी बाहेर पडलोय'
लोकसभेत वंचितला मुस्लिमांनी साथ दिली नाही. देशभरातील मुस्लीम समाज काँग्रेससोबत गेला; परंतु, त्यांना आता कळाले आहे की, आपण एकटे कोणाबरोबर गेलो तरी निवडून येवू शकत नाही. म्हणून महाराष्ट्रात मुस्लीम समाज वंचित आघाडी सोबत जोडला जात आहे. त्यामुळे एखादा पक्ष धर्माच्या नावाखाली मत मागत असेल, तर मुस्लीम त्याला मत देईल असे वाटत नाही, असे आनंदराज आंबेडकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... तुरुंगात गेलेल्यांनी सांगू नये आम्ही काय केले; पवारांचा अमित शाहांना टोला
भाजप सरकार सत्तेत येण्यापूर्वी भारत जगात आर्थिक दृष्ट्या तिसरा क्रमांकावर होता. परंतु आता नवव्या क्रमांकावर घसरला आहे. तसेच राज्य सरकारने शेतकऱ्यांना पाणी देऊन त्याला आणि त्याच्या शेतीला वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा होता, मात्र तसे न करता लाखो कोटी रुपये खर्च करून गरज नसतानाही समृद्धी महामार्ग, मेट्रो आणि बुलेट ट्रेन सारखी कामे केली जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सुद्धा आता पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज डोक्यावर घेऊन उभा आहे., असे आंबेडकर यावेळी म्हणाले.
हेही वाचा... 'आरे' येथे मेट्रो कारशेड हा भाजप सरकारचा हट्ट - जयराम रमेश
'अनेक कारखान्यांमधून उत्पादन बंद झाले आहे. शेकडो मजूर बेरोजगार झाले आहेत. कोल्हापूर-सांगली सारख्या भागात पूर परिस्थितीमुळे अद्यापही रोजगार उभा राहिलेला नाही. या सर्व गोष्टी सोडून हे सरकार धर्माच्या नावाखाली राजकारण करत आहे. राम मंदिर, 370 चा मुद्दा घेऊन सरकार देशाची दिशाभूल करत असल्याचाही आरोपही आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे.