ETV Bharat / state

परभणीत काँग्रेसचे बंडखोर सुरेश नागरे यांच्या घरावर पोलिसांची धाड - परभणी विधानसभा मतदारसंघ

परभणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरे यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. औरंगाबाद येथील गणेश पाटील या व्यक्तीने सुरेश नागरे यांच्या घरातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे होती.

सुरेश नागरे यांचे घर
author img

By

Published : Oct 20, 2019, 11:28 AM IST

परभणी - परभणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरे यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली. नागरे यांच्या जिंतूर रोडवरील घरातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

परभणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुरेश नागरे यांच्या घरावर पोलिसांनी धाड टाकली

या माहितीच्या आधारे शनिवारी रात्री अकरा वाजता निवडणूक पथकासह पोलिसांनी नागरेंच्या घरावर धाड टाकली. मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत पोलिसांनी घराची कसून झडती घेतली मात्र, घरात पैसे सापडले नाही. प्रचाराचे साहित्य आणि काही नवे कपडे आढळून आले. परभणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेल्या सुरेश नागरे यांना पक्षाने ऐनवेळी डावलून रविराज देशमुख यांना उमेदवारी दिली. त्यामुळे बंडखोरी करत सुरेश नागरे यांनी अपक्ष म्हणुन रिंगणात उडी घेतली. सुरूवातीपासूनच पैसेवाला उमेदवार म्हणून त्यांची चर्चा सुरू होती. शनिवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुरेश नागरे यांनी शहरातून जोरदार रॅली काढली.

हेही वाचा - पर्वतीमध्ये भाकरी फिरविण्याची हीच योग्य वेळ - डॉ अमोल कोल्हे

औरंगाबाद येथील गणेश पाटील या इसमाने सुरेश नागरे यांच्या घरातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे केली. त्यानुसार परभणी विधानसभेच्या निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे यांच्या सुचनेवरून अप्पर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन बगाटे, मनपाचे लेखाधिकारी जाधव यांच्या पथकाने रात्री अकराच्या सुमारास नागरे यांच्या घरावर छापा मारला.

Intro:परभणी - परभणी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर तथा अपक्ष उमेदवार सुरेश नागरे यांच्या जिंतूर रोडवरील घरातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यावरून रात्री सुमारे अकराच्या अकरा वाजता निवडणूक पथकासह पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली. मध्यरात्री अडीच वाजेपर्यंत पोलिसांनी घराची कसून झाडाझडती घेतली; परंतु घरात पैसे आढळून आली नाहीत, मात्र प्रचारासाठीचे अधिकचे साहित्य आणि नवेकोरे कपडे आढळून आल्याची माहिती आहे.Body:परभणी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे तिकीट मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतलेल्या सुरेश नागरे यांना पक्षाने ऐनवेळी डावलून रविराज देशमुख यांना उमेदवारी दिली. मात्र उमेदवारी मिळाली नाही नसली तरी बंडखोरी करत सुरेश नागरे यांनी अपक्ष म्हणुन रिंगणात उडी घेतली. सुरूवातीपासूनच पैसेवाला उमेदवार म्हणून त्यांची चर्चा सुरू झाली. त्यानुसार पोलीस आणि निवडणूक पथक देखील त्यांच्यावर डोळे वटारून होते. काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सुरेश नागरे यांनी शहरातून जोरदार रॅली काढली. या रॅलीत मोठ्या प्रमाणात महिलांसह पुरुष सहभागी झाले होते. त्यामुळे रॅलीतील नागरीकांचा नागरे यांच्या घरी रात्री बारावाजेपर्यंत गर्दा होता. पोलिसांनी तीन वेळा येऊन या लोकांना तेथून काढण्याचा प्रयत्न केला; परंतु गर्दी हटत नव्हती. त्यातच औरंगाबादच्या गणेश पाटील या इसमाने सुरेश नागरे यांच्या घरातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याची तक्रार निवडणूक विभागाकडे केली होती. त्यानुसार परभणी विधानसभेच्या निवडणूक अधिकारी सुचिता शिंदे यांच्या सुचनेवरून अप्पर पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन बगाटे, मनपाचे लेखाधिकारी जाधव यांच्या पथकाने रात्री अकराच्या सुमारास नागरे यांच्या घरावर छापा मारला. या छाप्यात पोलिसांनी घरातील प्रत्येक खोलीत तपासणी केली. शिवाय प्रचारासाठी आलेल्या साहित्याची देखील मोजणी केली. मात्र निवडणूक विभागाला सादर केलेल्या रेकॉर्ड पेक्षा अनेक साहित्य जास्तीचे आढळून आले. शिवाय घरात नवेकोरे शर्ट पीस आणि पॅन्ट पीस देखील सापडले. मात्र संपूर्ण घराची झडती घेऊनही कुठेही पैसे सापडले नाहीत. ही तपासणी रात्री अडीच वाजेपर्यंत चालू राहिली. परंतु सकाळी दहा वाजेपर्यंत देखील निवडणूक विभागाने या प्रकरणात नेमकी काय कारवाई केली याची अधिकृत माहिती दिली नव्हती.
दरम्यान, या छाप्याची शहरात जोरदार चर्चा होत असून मोठ्या प्रमाणात पैसे आढळून आल्याची अफवा देखील रात्रभर शहरात पसरल्या होत्या.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_nagre_red_photo_1 to 3
& pbn_nagre_home_red_vis
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.