परभणीत रस्त्यावर सोनं गोळा करायला नागरिकांची झुंबड... - parbhani viral video
ब्राह्मणगाव येथे एका टेम्पोतून मण्यांचे पाकीट पडले. हे मणी सोन्याचे असल्याचे सर्वत्र पसरताच विखुरलेले मणी गोळा करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. सध्या या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
परभणी - ब्राह्मणगाव येथे एका टेम्पोतून मण्यांचे पाकीट पडले. हे मणी सोन्याचे असल्याचे सर्वत्र पसरताच विखुरलेले मणी गोळा करण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडाली. सध्या याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
नक्की काय घडलं...?
आज सकाळी गंगाखेडच्या दिशेने जाणाऱ्या एका टेम्पोमधून बेन्टेक्सचे मणी असलेले पाकीट रस्त्यावर पडले. संबंधित पाकीट फुटल्यानंतर त्यातील मणी विखुरले; आणि बघता बघता रस्त्यावर एकच झुंबड उडाली. प्रत्येकजण हे सोन्यासारखे वाटणारे मणी वेचण्यात दंग झाला. अनेकांनी रस्त्याच्या बाजूलाच गाड्या लावल्याने सर्वत्र वाहतूक विस्कळीत झाली होती. काही वेळानंतर हे मणी बेन्टेक्सचे असल्याचे लक्षात येताच या लोकांचा हिरमोड झाला.
परभणी - येथून जवळच असलेल्या ब्राह्मणगाव पाटीवर एका टेम्पोतून पडलेले बेन्टेक्सच्या मन्याचे पाकीट फुटले आणि त्यातून विखुरलेले मणी सोन्याचे समजून ते गोळा करण्यासाठी फाट्यावरील नागरिकांची एकच झुंबड उडाली होती. बराच काळ मणी भेटल्यानंतर ते बेन्टेक्स चे असल्याने मनी वेचणाऱ्या नागरिकांचा हिरमोड झाला दरम्यान या प्रकारामुळे परभणी गंगाखेड रस्त्यावर महामार्गावरची वाहतूक बराच काळ विस्कळीत झाली होती.Body:
सोनं म्हटलं की माणसातली लालूच जागी होते. अशीच लालूच आज परभणीजवळ पाहायला मिळाली. आज (बुधवार) सकाळच्या सुमारास या ठिकाणाहून गंगाखेडकडे गेलेल्या एका टेम्पोमधून 'बेन्टेक्स'चे मनी असलेले पाकीट खाली रस्त्यावर पडले. त्यानंतर हे पाकीट फुटून त्या पाकिटातील मनी रस्त्यावर विखरून पडले होते. त्या ठिकाणच्या नागरिकांना ते मनी सोन्याचे वाटले आणि पाहता-पाहता फाट्यावरील सर्वच नागरिकांनी मनी गोळा करण्यासाठी तोबा गर्दी केली. प्रत्येकजण सोन्याचे मनी समजून ते वेचण्यात दंग होता. काहींनी तर या प्रकाराचा व्हिडिओ देखील केला. मात्र काही वेळातच हे मनी बेन्टेक्स असल्याचे कळाल्यानंतर मनी वेचणाऱ्या सर्वांचाच हिरमोड झाला. दरम्यान या प्रकारामुळे बराच काळ परभणी गंगाखेड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. अनेकांनी रस्त्याच्याकडेला आपली गाडी लावून मनी गोळा करण्यासाठी धडपड केल्याचेही दिसून आले.
- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_gold_beads_collection_visConclusion: