ETV Bharat / state

परभणी बसस्थानकात 'कोरोना'चे तपासणी केंद्र बेवारसच...

परभणी शहर बसस्थानकात सुरू करण्यात आलेल्या आरोग्य कक्ष सकाळी सुरू केल्यानंतर अचानक दुपारपासून बेवारस स्थितीत पडला. शुक्रवारी सकाळीच या कक्षाचे उद्घाटन करण्यात आले होते. कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाने प्रवाशांच्या तपासणीसाठी या कक्षाची सुरूवात करण्यात आली.

परभणी बसस्थानकात 'कोरोना'चे तपासणी केंद्र बेवारस

author img

By

Published : Mar 20, 2020, 8:44 PM IST

Updated : Mar 20, 2020, 9:17 PM IST

परभणी - कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी येथील बस स्थानकात पुणे, मुंबई तसेच इतर मोठ्या शहरातून येणाऱ्या बसमधील प्रवाशांची तपासणी करायला आरोग्य तपासणी कक्षाची स्थापना करण्यात आली होती. विशेष म्हणजे आज (शुक्रवारी) सकाळीच हा कक्ष उघडण्यात आला होता. मात्र, दुपारनंतर हे तपासणी कक्ष अक्षरशः बेवारस स्थितीत पडले. आरोग्य विभागाने केवळ फोटो काढण्यापुरता उद्घाटनाचा कार्यक्रम उरकवला आणि या तपासणी केंद्राकडे सपशेल दुर्लक्ष केले. यामुळे प्रवांशांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. तर आरोग्य आणि जिल्हा प्रशासन 'कोरोना' च्या बाबतीत किती गंभीर आहे, हेच यावरून स्पष्ट होत आहे.

परभणी बसस्थानकात 'कोरोना'चे तपासणी केंद्र बेवारसच...

संपूर्ण जगात कोरोणाच्या विषाणूंनी दहशत माजवली आहे. भारतात तसेच महाराष्ट्रात हा विषाणू जास्त प्रमाणात पसरू नये, म्हणून काळजी घेण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी लोकांच्या तपासण्या होत आहेत. या आजाराचा प्रसार होण्याची शक्यता असल्याने विमानतळ, रेल्वे स्थानक तसेच बस स्थानकात आलेल्या प्रवाशांना तपासूनच पुढे पाठविण्यात येत आहेत. यामुळेच परभणी शहरातील बस स्थानकातदेखील आरोग्य विभागाच्यावतीने तपासणी कक्ष उघडण्यात आला होता. शुक्रवारी सकाळी जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे, उपजिल्हाधिकारी अरविंद लोखंडे तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या आरोग्य तपासणी कक्षाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच बाजूला मोठा मंडप टाकून त्याचा गाजावाजा करण्यात आला. या कार्यक्रमाचे फोटोही काढून प्रसारमाध्यमांना पाठवण्यात आले.

यानंतर या आरोग्य तपासणी कक्षात डॉक्टर बसून राहणे अपेक्षित होते. मात्र, सकाळी काही मोजक्या बसमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून हे तपासणी केंद्र गुंडाळण्यात आले. तपासणी केंद्राचे फलक आणि मंडप तसेच खुर्च्या, टेबल जागेवर असले तरी त्यावर कुठलाही कर्मचारी डॉक्टर परिचारिका बसलेला दिसून आला नाही. सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत या तपासणी केंद्राचा आढावा घेण्यात आला; तरीदेखील एकही कर्मचारी या ठिकाणी फिरकला नाही.

हेही वाचा - बंदमधून शेअर बाजाराला वगळले; बँकांचेही व्यवहार राहणार सुरू

दरम्यान, सायंकाळी चार वाजता पाथरी बस स्थानकाची पुणे बस परभणीत दाखल झाली. त्यातून काही प्रवासी परभणीत उतरले. त्यानंतर परभणी-कल्याण बस सायंकाळी सहा वाजता आली. त्यातूनही प्रवासी उतरले. याप्रमाणेच पुणे-वसमत ही गाडी देखील सायंकाळी सात वाजता परभणी दाखल झाली आणि त्यातूनही पुण्याचे काही प्रवासी उतरले. याशिवाय रात्री साडेदहा वाजेपर्यंत आणखीन दोन गाड्या पुणे-मुंबई या ठिकाणाहून येणार आहेत. त्यातूनही काही प्रवासी परभणीत उतरतील. मात्र, एकाही प्रवाशाची आरोग्य तपासणी या ठिकाणी झालेली नाही. हे सर्व पुणे, मुंबई येथून आलेले प्रवासी बिनधास्त शहरांमध्ये दाखल झाले आहेत. ही अत्यंत चिंतेची बाब आहे. मात्र, आरोग्य विभाग याबाबत किती गाफील आहे, हे यावरून दिसून येत आहे. या प्रकाराबद्दल सामान्य नागरिक आणि बसस्थानकावर आलेले प्रवासी संताप व्यक्त करत आहेत.

Last Updated : Mar 20, 2020, 9:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.