ETV Bharat / state

परभणीत आंदोलनाला हिंसक वळण; पोलिसांवर दगडफेक, गाड्या फोडल्या, शहरात तणाव - vehicles ablazed in parbhani

शहरात आज नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या मोर्चानंतर काही उपद्रवी लोकांनी या आंदोलनाला हिंसक वळण दिले. अग्निशमन दलाची गाडी तसेच इतर चार चाकी गाड्या आणि मोटर सायकली फोडल्या. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करत त्यांना पिटाळून लावले. यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

परभणीत आंदोलनाला हिंसक वळण
परभणीत आंदोलनाला हिंसक वळण
author img

By

Published : Dec 20, 2019, 6:50 PM IST

Updated : Dec 20, 2019, 7:08 PM IST

परभणी - शहरात आज नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या मोर्चानंतर काही उपद्रवी लोकांनी या आंदोलनाला हिंसक वळण दिले. आमची मागणी पूर्ण करा, यासाठी काही आंदोलक ठाण मांडून होते. त्यातील काहींनी पोलिसांवर आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवर जोरदार दगडफेक केली. अग्निशमन दलाची गाडी तसेच इतर चार चाकी गाड्या आणि मोटारसायकली फोडल्या. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करत त्यांना पिटाळून लावले. यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा - नागरिकत्व कायद्याचा कडाडून विरोध; परभणीत प्रचंड मोर्चा

नागरिकत्व कायद्याच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चानंतर शेवटी काही विघ्नसंतोषी लोकांनी या आंदोलनाला हिंसक वळण दिले. आंदोलनातील काही समुदाय आमच्या मागण्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, यासाठी आंदोलनस्थळी ठाण मांडून होते. मात्र, त्यातील काही उपद्रवी लोकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. पळापळ सुरू झाली, आंदोलकांनी आंदोलन स्थळाजवळ असलेल्या काही घरांवर तुफान दगडफेक केली. या ठिकाणच्या वरीष्ठ विधीज्ञ अशोक सोनी यांच्या घराची काच फोडली. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक गाड्या पाडून त्यांची तोडफोड केली. विशेष म्हणजे अग्निशमन दलाची गाडी देखील फोडून टाकण्यात आली. काही चारचाकी गाड्या देखील फोडण्यात आल्या.

हेही वाचा - 'जामिया'च्या विद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ परभणीत युवक काँग्रेसची निदर्शने

या दरम्यान, पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेत हिंसक झालेल्या आंदोलकांवर लाठीमार करत त्यांना पिटाळून लावले. हा प्रकार सुमारे पंधरा ते वीस मिनिटे चालला. ज्यामुळे संपूर्ण शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पोलिसांनी आंदोलकांना पिटाळून लावले असून सर्वत्र तगडा बंदोबस्त ठेवला आहे. परिस्थिती निवळली असली तरी शहरातील तणाव मात्र कायम आहे.

Intro:परभणी - परभणी शहरात आज नागरिकत्व कायद्याच्या विरोधात झालेल्या मोर्चानंतर काही उपद्रवी लोकांनी या आंदोलनाला हिंसक वळण दिले. आमची मागणी पूर्ण करा, यासाठी काही आंदोलक ठाण मांडून होते. त्यातील काहींनी पोलिसांवर तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या गाड्यांवर जोरदार दगडफेक केली. अग्निशमन दलाची गाडी तसेच इतर चार चाकी गाड्या आणि मोटर सायकल फोडल्या. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार करत त्यांना पिटाळून लावले. यामुळे शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
Body:
नागरिकत्व कायद्याच्या विरोधात काढण्यात आलेल्या मोर्चानंतर शेवटी काही विघ्नसंतोषी लोकांनी या आंदोलनाला हिंसक वळण दिले. आंदोलनातील काही समुदाय आमच्या मागण्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे, यासाठी आंदोलनस्थळी ठाण मांडून होते. मात्र त्यातील काही उपद्रवी लोकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे गोंधळ निर्माण झाला. पळापळ सुरू झाली, आंदोलकांनी आंदोलन स्थळाजवळ असलेल्या काही घरांवर तुफान दगडफेक केली. या ठिकाणच्या वरीष्ठ विधीज्ञ अशोक सोनी यांच्या घराचे काच फोडले. तसेच रस्त्यावर उभ्या असलेल्या संख्या गाड्या पाडून त्यांची तोडफोड केली. विशेष म्हणजे अग्निशमन दलाची गाडी देखील फोडून टाकण्यात आली. काही चारचाकी गाड्या देखील फोडण्यात आल्या.
या दरम्यान, पोलिसांनी देखील आक्रमक भूमिका घेत हिंसक झालेल्या आंदोलकांवर लाठीमार करत त्यांना पिटाळून लावले. हा प्रकार सुमारे पंधरा ते वीस मिनिट चालला. ज्यामुळे संपूर्ण शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पोलिसांनी आंदोलकांना पिटाळून लावले असून, सर्वत्र तगडा बंदोबस्त ठेवला आहे. परिस्थिती निवळली असली तरी शहरातील तणाव मात्र कायम आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- visuals : pbn_movement_violent_visConclusion:
Last Updated : Dec 20, 2019, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.