परभणी - शहरातील ७० हजार मालमत्तांची कर वसुली ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठीची कार्यप्रणाली कशी असणार आहे, याबाबत माहिती देण्यासाठी महापालिकेची कार्यशाळा पार नुकतीच पडली. यावेळी पालिका आयुक्त रमेश पवार, मुख्य लेखा अधिकारी गणपत जाधव, सहाय्यक आयुक्त अल्केश देशमुख यांसह पालिकेचे इतर अनेक अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
हेही वाचा... शेतकऱ्यांनी पपईच्या बागेवर फिरवला नांगर, परतीच्या पावसामुळे लाखोंचे नुकसान
कार्यशाळेत पालिका आयुक्त रमेश पवार यांनी कर निरीक्षक व वसुली लिपीक यांना त्यांच्याकडील वसुली वॉर्डची अद्यावत माहिती पुढील तीन दिवसांत सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. प्रभागातील मालमत्तांची संख्या, थकबाकीचा कालावधी, थकबाकीची डिमांड, चालु डिमांड व एकूण डिमांड अशा प्रकारची माहिती गोळा करण्यात येणार आहे. अद्ययावत व अचुक माहिती ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये नोंदवणे, प्रिंट काढून ती माहिती अचुक आहे, यांची तपासणी त्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश यावेळी आयुक्त रमेश पवार यांनी दिले.
हेही वाचा... यवतमाळचे व्यापारी मालामाल; शेतकऱ्यांच्या मालाला मात्र कवडीमोल दर
ऑनलाईन वसुलीची प्रणाली कशी आहे, तिचा वापर कसा करावा, अभिलेखे नोंदवणे कसे सोपे होणार आहे, याबाबतची माहिती या कार्यशाळेत देण्यात आली. तसेच उपस्थितांना प्रात्याक्षिक देखील दाखवण्यात आले. याप्रणाली बाबत सर्व कर निरीक्षक व वसुली लिपीक यांच्या शंकाचे निरसन यावेळी करण्यात आले. तसेच ऑनलाईन प्रणालीबाबत सर्व वसुली लिपीक व कर निरीक्षक यांना वैयक्तिक स्वरुपात प्रशिक्षण देण्यात येणार असून वसुलीसाठी ३५ वसुली लिपीक यांना मोबाईल टॅब देण्यात येणार आहेत.
हेही वाचा... रत्नागिरीतील लांजात आढळला साडेआठ फूट लांबीचा अजगर
ऑनलाईन वसुलीच्या या नव्या प्रणालीमुळे नागरिकांना आता घर बसल्या मालमत्ता कराचा भरणा करता येणार आहे. आपल्या मालमत्तेचा कर व त्याचा तपशील ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ई-प्रशासन अंमलात येणार असून कमीत कमी पेपरचा वापर होणार आहे. तसेच अचुक माहिती देता येणार आहे. महत्वाचे म्हणजे वसुलीमध्ये पारदर्शकता वाढणार आहे. आणि नागरिकांचीही सोय होणार आहे. त्यामुळे ही सुविधा येत्या काही दिवसांतच कार्यान्वित होईल, अशी माहिती महापालिकेच्यावतीने देण्यात आली आहे.