ETV Bharat / state

परभणी : संचारबंदीत किरकोळ वाहतूक सुरूच; प्रतिष्ठाने मात्र कडकडीत बंद

author img

By

Published : Mar 13, 2021, 10:49 AM IST

परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतून संचारबंदीसंदर्भात घोषणा केली. त्यानुसार शुक्रवारी रात्री बारा वाजेपासून सोमवारी पहाटे सहापर्यंत परभणीत शहर महापालिकेच्या 5 किलोमीटर हद्दीत तसेच जिल्ह्यातील अन्य 8 नगरपालिकांच्या 3 किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू असेल.

परभणी : संचारबंदीत किरकोळ वाहतूक सुरूच; प्रतिष्ठाने मात्र कडकडीत बंद
परभणी : संचारबंदीत किरकोळ वाहतूक सुरूच; प्रतिष्ठाने मात्र कडकडीत बंद

परभणी : कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता परभणीत प्रशासनाने शनिवार आणि उद्या रविवार असे दोन दिवस संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदीला सुरूवात झाल्यावर पहिल्या दिवशी मात्र रस्त्यावर किरकोळ वाहतूक सुरू असल्याचे चित्र बघायला मिळाले. तर व्यापाऱ्यांनी मात्र आपली दुकाने बंद ठेवत संचारबंदीला सहकार्य केले आहे. संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र बघायला मिळाले.

परभणीत दोन दिवसांच्या संचारबंदीला सुरूवात
परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी मुंबईतून संचारबंदीसंदर्भात घोषणा केली. त्यानुसार शुक्रवारी रात्री बारा वाजेपासून सोमवारी पहाटे सहापर्यंत परभणीत शहर महापालिकेच्या 5 किलोमीटर हद्दीत तसेच जिल्ह्यातील अन्य 8 नगरपालिकांच्या 3 किलोमीटर परिसरात ही संचारबंदी लागू असेल.31 मार्च पर्यंत 'हे' राहणार बंदपरभणी शहर तसेच जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी अनेक बाबींवर प्रतिबंध लावले आहेत. यात धार्मिक स्थळे बंद करण्यात आली असून काही काळ विदर्भातील वाहतूकही बंद करण्यात आली होती. शाळा बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय शहरातील लग्नकार्य, मोर्चे, निदर्शने आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांवरही आता 31 मार्चपर्यंत बंदी आणण्यात आली आहे.
परभणीत कडकडीत बंद
परभणीत कडकडीत बंद

संचारबंदीतून यांना सूट

या संचारबंदीदरम्यान सर्व प्रकारच्या अस्थापना, कारखाने, दुकाने, व्यवसाय आणि खाजगी कार्यालये बंद राहणार आहेत. मात्र शासकीय कार्यालय आणि त्यांच्या वाहनांना सूट देण्यात आली आहे. शिवाय सरकारी, खाजगी दवाखाने, औषध दुकाने, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, लसीकरण केंद्र आणि कोरोनाच्या चाचण्या करणारे केंद्र सुरू राहणार आहेत. याशिवाय अत्यावश्यक सेवांचे परवाने घेतलेल्या व्यक्ती आणि वाहनांना सूट देण्यात आली आहे. तसेच माध्यम प्रतिनिधी आणि दैनिकांच्या वितरकांना देखील सूट आहे. याप्रमाणेच पेट्रोल पंप, गॅस वितरक आणि दूध विक्रेते यांना सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. याप्रमाणेच परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी येणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसला या संचारबंदीतून सूट असणार आहे.

परभणीत कडकडीत बंद
परभणीत कडकडीत बंद
347 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरूपरभणी शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळपर्यंत 44 नवे कोरोनाग्रस्त आढळले होते. तर एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयातील कोरोना कक्षात सध्या 347 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत जिल्ह्यातील 341 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 9 हजार 143 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्या असून, त्यापैकी 8 हजार 455 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत.बस, रेल्वे वाहतूक सुरूपरभणी जिल्ह्यातील शहरी भागात संचारबंदी असल्याने जिल्हा अंतर्गत बस वाहतूक बंद करण्यात आली आहे. परंतु राज्यातील अन्य जिल्ह्यांमधून येणारी बस वाहतूक सुरू आहे. यामुळे परभणीच्या बस स्थानकावर बस आणि प्रवाशांची गर्दी दिसून येत होती. रेल्वेस्थानकावरही प्रवाशांचीही ये-जा सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शहरातूनही प्रवासी ऑटो रिक्षाच्या माध्यमातून बसस्थानक आणि रेल्वे स्थानकाकडे जाताना दिसून आले. तर वृत्तपत्र विक्रेते, दूध विक्रेतेही रस्त्यांवर पाहायला मिळाले.बाजारपेठ कडकडीत बंदसंचारबंदीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातील बाजारपेठ मात्र कडकडीत बंद असल्याचे दिसून आले. ज्यामुळे शहरातील वसमत रोड, जिंतूर रोड, स्टेशन रोड, सुभाष रोड, शिवाजी चौक, गुजरी बाजार, गांधी पार्क, क्रांती चौक, अष्टभुजा देवी मंदिर आणि मुख्य बाजारपेठेचा भाग निर्मनुष्य झाला आहे. पोलिसांनी देखील ठिकठिकाणी बंदोबस्त लावला असून, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांकडून अडविण्यात येत आहे.

हेही वाचा - मुंबई : कंगनासह चार जणांवर पुन्हा गुन्हा दाखल, वाचा...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.