ETV Bharat / state

परभणी : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील खरदडी येथे घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिंतूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भगवान मंच्छी राठोड (वय ३२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
author img

By

Published : Mar 30, 2021, 4:13 PM IST

परभणी - शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील खरदडी येथे घडली आहे. या हल्ल्यात शेतकरी जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी जिंतूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भगवान मंच्छी राठोड (वय ३२) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

रविवारी दुपारच्या सुमारास भगवान राठोड हे शेतात काम करत असताना अचानक त्यांच्या अंगावर बिबट्याने हल्ला केला. मात्र, शेतकऱ्याने आरडाओरडा करताच आजूबाजूच्या शेतातील शेतकरी धावत आले. इतर शेतकऱ्यांना पाहाताच बिबट्याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र या हल्ल्यात राठोड हे जखमी झाल्याने, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

2 महिन्यांपूर्वीही मादी बिबट्याची दहशत

दरम्यान, 2 महिन्यांपूर्वी जिंतूर तालुक्यातील वाघी परिसरातील वडी या गावात बिबट्याचे पिल्लू विहिरीत पडल्याची घटना घडली होती. त्यावेळी वन विभागाने या पिल्लास सुरक्षीत बाहेर काढून जंगलात सोडले होते. मात्र, सदर पिल्लाची माता पिल्लांच्या शोधात वाघी-वडी शेत शिवारात फिरत होती. तिने अनेक शेतकऱ्यांच्या गायी, शेळ्या फस्त केल्या. अनेकवेळा या बिबट्याचे शेतकऱ्यांना दर्शन होत असल्याने परिसरात दहशत पसरली होती. आता पुन्हा एकदा बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केल्याने या बिबट्याची दहशत पसरली आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागमी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

हेही वाचा - अभ्यासाचे साहित्य जळाले, वसतीगृहाला आग, ७४ विद्यार्थ्यांचा थोडक्यात वाचला जीव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.