ETV Bharat / state

परभणीचा समावेश तिसऱ्या स्तरात; सोमवारपासून होणार 'या' सेवा सुरू

author img

By

Published : Jun 6, 2021, 8:05 PM IST

परभणीचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्के असून, या ठिकाणी 16 टक्के ऑक्सिजन बेड बेडवर रुग्ण असल्याने जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरामध्ये करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात उद्या सोमवारपासून लॉकडाऊन दरम्यान विविध अस्थापना आणि सेवांना दुपारी 4 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे.

परभणीचा समावेश तिसऱ्या स्तरात; सोमवारपासून होणार 'या' सेवा सुरू
परभणीचा समावेश तिसऱ्या स्तरात; सोमवारपासून होणार 'या' सेवा सुरू

परभणी - जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट 8 टक्के असून, या ठिकाणी 16 टक्के ऑक्सिजन बेड बेडवर रुग्ण असल्याने जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरामध्ये करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यात उद्या सोमवारपासून लॉकडाऊन दरम्यान विविध अस्थापना आणि सेवांना दुपारी 4 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. मात्र, शनिवार आणि रविवार हे दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यात कडक लॉकडाऊन कायम राहणार असल्याचे आदेश आज (रविवारी) जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी बजावले आहेत.

दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने अनलॉक बाबत बैठक घेऊन राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण पाहून त्या जिल्ह्यांचा विविध स्तरांमध्ये समावेश केला आहे. त्यानुसार परभणी तिसऱ्या स्तरात असून, राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आज रविवारी जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी विविध आस्थापना, सेवा, शासकीय कार्यालय आणि प्रवाशी वाहतूक आदींबाबत नियमावली जाहीर केली आहे.

सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सर्व आस्थापनांना सूट -
दरम्यान, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी आपात्कालीन उपाययोजनेचा भाग म्हणून जिल्ह्यात 16 जूनपर्यंत लॉकडाउनला मुदतवाढ दिली आहे. या अंतर्गत उद्या सोमवारपासून शुक्रवारपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना आणि दुकानांना तसेच सेवांना सायंकाळी चार वाजेपर्यंत सूट दिली आहे, तर सायंकाळी पाच वाजेनंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे. सायंकाळी चार वाजता अस्थापना दुकाने बंद झाल्यानंतर नागरिकांना 5 वाजेपर्यंत आपापल्या घरी पोहोचता येणार आहे. मात्र 5 वाजेनंतर कोणीही रस्त्यावर प्रवास करू नये, फिरू नये, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

मॉल, सिनेमा हॉल बंदच -
विशेष म्हणजे गर्दी होणाऱ्या ठिकाणांना या लॉकडाऊनमध्ये कुठलीही सूट देण्यात आली नाही. त्यामुळे मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह आदी बंदच राहणार आहेत. तर हॉटेल्स व रेस्टॉरंट यांना सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्यास सूट देण्यात आली असून, शनिवार-रविवार ते फक्त पार्सल सेवा अर्थात घरपोच सेवा देऊ शकतील. तसेच सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, मॉर्निंग वॉकसाठी वापरले जाणारे रस्ते, सायकलिंग आदींसाठी पहाटे 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. खेळाच्या मैदानांना पहाटे प्रमाणेच सायंकाळी 6 ते 9 दरम्यान सूट देण्यात आली असून, शनिवार-रविवार मात्र बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शासकीय कार्यालयांमध्ये 50 टक्के उपस्थिती
सदर आदेशात शासकीय कार्यालयांना 50 टक्के उपस्थितीसह सूट देण्यात आली आहे. याशिवाय खाजगी आस्थापना व कार्यालये देखील सोमवार ते शुक्रवार या दरम्यान दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र शनिवार-रविवार बंद ठेवावी लागणार आहेत. याशिवाय सामाजिक, सांस्कृतिक आणि करमणुकीच्या कार्यक्रमांना 50 टक्के क्षमतेसह सूट देण्यात आली असून, लग्न समारंभाला 50 लोकांच्या उपस्थितीत पूर्वपरवानगीने सूट देण्यात आली आहे. अंत्यविधी 20 लोकांच्या उपस्थित करावा लागणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वसाधारण बैठकांना 50 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक उपस्थिती राहू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

कृषीपूरक सेवांना सूट -
सध्या पेरण्याचे दिवस असून या पार्श्वभूमीवर कृषी आणि कृषिपूरक सेवांना आठवड्यांचे सर्व दिवस दुपारी 4 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. याशिवाय ई-कॉमर्स सेवांना देखील पूर्णवेळ सूट देण्यात आली आहे.

व्यायामशाळा, सलूनला 50 टक्के क्षमतेसह सूट -
दरम्यान, व्यायामशाळा, सलुन, ब्युटीपार्लर, वेलनेस सेंटर आदींना 50 टक्के क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत सूट देण्यात आली आहे. मात्र या दुकानात येणाऱ्या ग्राहकांना पूर्वनियोजित वेळ ठरवून येणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणची वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवू नये, असे निर्बंध घालण्यात आले आहे. तर या ठिकाणी सेवा देणाऱ्या व्यक्तींचे लसीकरण करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

प्रवासी वाहतुकीला पूर्ण क्षमतेसह सूट -
जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात एसटी महामंडळ व इतर प्रवासी वाहतूकदारांना पूर्ण क्षमतेसह सूट देण्यात आली आहे. मात्र, या बसमध्ये कोणीही प्रवासी उभे राहून प्रवास करणार नाही, असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मालवाहतूक नियमित सुरू राहणार आहे, तर खाजगी वाहने, टॅक्सी, बसेस, लांब पल्ल्याच्या रेल्वेद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नियमित सूट देण्यात आली असली तरी या वाहनांमधून पाचव्या स्तरांमध्ये समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये जाण्यासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला आहे.

उद्योगांना नियमितपणे पूर्णवेळ सूट -
विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून उत्पादन बंद पडले आहे. परिणामी, कामगार वर्ग आर्थिक संकटांना तोंड देत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अत्यावश्यक मालाचे उत्पादन करणाऱ्या तसेच कच्च्या मालाचे उत्पादन करणाऱ्या उद्योगांना पूर्णवेळ सूट देण्यात आली आहे. तसेच अन्य उद्योजकांना 50 टक्के कर्मचारी क्षमतेसह सूट देण्यात आली आहे. मात्र, बाहेर गावाहून येणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करावी, अशी अट उद्योजकांसाठी घालण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.