ETV Bharat / state

परभणी : शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी - Parbhani Corona News Update

'कोरोना' चा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि मनपा प्रशासनाने 3 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. या ठिकाणी वाहनधारकांची चौकशी करून, त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी

author img

By

Published : May 17, 2021, 8:30 PM IST

परभणी - 'कोरोना' चा संसर्ग प्रचंड वेगाने वाढत असून, या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र, असे असतानाही रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. त्यामुळे विनाकारण फिरणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि मनपा प्रशासनाने 3 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. या ठिकाणी वाहनधारकांची चौकशी करून, त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. आज तब्बल 632 विनाकारण शहरात फिरणाऱ्या वाहनधारकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच काही वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत.

गांधी पार्क येथे 300 जणांची कोरोना चाचणी

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी पार्क येथे किरकोळ कारणासाठी फिरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या भागातून अनेक तरूण मोटरसायकलवर विनाकारण फिरताना आढळून येतात. वारंवार सांगून देखील ऐकत नसल्याने, नानलपेठ पोलीस आणि मनपाच्या संयुक्त पथकाने या ठिकाणी आरटीपीसीआर तपासणी शिबिर लावले होते. तसेच नाकाबंदी करून येणार्‍या-जाणार्‍या प्रत्येक वाहनधारकांची चौकशी करण्यात येत होती. यामध्ये सुमारे 300 वाहनधारक रस्त्यावर विनाकारण फिरताना आढळून आले. त्यामुळे त्यांची आरटीपीसीआर तपासणी करून वाहने देखील जप्त करण्यात आली आहेत. या ठिकाणी महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुऱ्हा आणि पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

जाम नाक्यावर 160 जणांची कोरोना चाचणी

शहरातील जिंतूर रोडवरील जाम नाक्यावर महापालिका आणि कोतवाली पोलीसांच्या वतीने नाकाबंदी करून संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. या ठिकाणी कोतवाली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहात्तरे आणि मनपाचे सहा.आयुक्त शिवाजी सरनाईक, मुख्य स्वच्छता निरीक्षक करण गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या वतीने कारवाई सुरू आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्या 160 जणांची कोरोना चाचणी याठिकाणी करण्यात आली आहे.

शहरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी

वसमत रस्त्यावर 232 वाहनधारकांची तपासणी

वरील दोन ठिकाणांप्रमाणेच परभणी शहरातील वसमत रोड वरील काळीकमान परिसरात देखील महापालिकेच्यावतीने आरटीपीसीआर तपासणीचे शिबिर आयोजित केले होते. या ठिकाणी नवामोंढा पोलिसांच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या नाकाबंदीत प्रत्येक वाहनधारकाची चौकशी करण्यात येत होती. सकाळी अकरा वाजल्यापासून सुरू झालेली ही तपासणी मोहीम सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. या दरम्यान विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून आलेल्या 232 वाहनधारकांची आरटीपीसीआर तपासणी करून त्यांची वाहने नवामोंढा पोलिसांनी जप्त केले आहेत.

हेही वाचा - 'पीएम केअर व्हेंटिलेटर आणि मोदींमध्ये अनेक समानता, दोघेही कूचकामी'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.