ETV Bharat / state

परभणीत काँग्रेसकडून मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या कार्यकाळाचा निषेध - भाजप सरकार

केंद्रातील भाजप सरकारने आज सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मात्र, या कार्यकाळात मोदी सरकारने दाखवलेल्या स्वप्नांची कुठलीही पूर्तता केलेली नाही. याबद्दल मोदी सरकारचा निषेध करत परभणीत काळ्या रुमाल घालून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

parbhani congress agitation against modi government

author img

By

Published : May 30, 2021, 8:36 PM IST

Updated : May 30, 2021, 8:42 PM IST

परभणी - केंद्रातील भाजप सरकारने आज सात वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. मात्र, या कार्यकाळात मोदी सरकारने दाखवलेल्या स्वप्नांची कुठलीही पूर्तता केलेली नाही. याबद्दल मोदी सरकारचा निषेध करत परभणीत काळ्या रुमाल घालून काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन पार पडले.

जनतेच्या अपेक्षा भंग झाल्याचा आरोप -

दरम्यान, 'मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात जनतेच्या अपेक्षा भंग झाल्याचा आरोप करत हे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांनी विविध सात मागण्यांसाठी हे आंदोलन केल्याची माहिती दिली. या आंदोलनादरम्यान मोदी सरकारने जनतेला विविध विकासाची दाखवलेली स्वप्ने पूर्ण फोल ठरल्याचा आरोप केला.

काँग्रेसकडून मोदी सरकारच्या 7 वर्षांच्या कार्यकाळाचा निषेध
इंधन दरवाढीचा निषेध - या आंदोलनात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किमतींचा देखील निषेध करण्यात आला. याशिवाय आरक्षणाचा मुद्दा आणि इतर विविध मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनात परभणी शहर काँग्रेसचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Last Updated : May 30, 2021, 8:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.