ETV Bharat / state

परभणीत 'एटीएस'ने भंगार विक्रेत्याविरुद्ध केला गुन्हा दाखल - परभणी एटीएसची कारवाई

परभणीच्या एटीएस पथकाने भंगार विक्रेत्याविरुद्ध कारवाई केली. भंगार साहित्य विकणार्‍यांचा किंवा त्यांच्याकडून भंगार साहित्य विकत घेऊन जाणाऱ्यांची माहिती ठेवली नसल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

परभणी एटीएसची कारवाई
author img

By

Published : Sep 17, 2019, 3:44 PM IST

परभणी - परभणीच्या 'एटीएस'ने (दहशतवादी विरोधी पथकाने) शहरातील एका भंगार विक्रेत्याविरुद्ध कारवाई करत त्याच्यावर नवामोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गेल्या दोन महिन्यात 'एटीएस'ने परभणीसह पाथरी, पूर्णा आणि गंगाखेड येथे भंगार व्यवसायिक, सायबर कॅफे, लॉजचालक, मोबाईलविक्रेते, प्रिंटर्स आणि स्फोटकांसंबंधी व्यवसाय करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.

दरम्यान, संबंधित व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायासंबंधी विस्तृत नोंदणी ठेवणे आवश्यक आहे. मात्र, हे व्यवसायिक खरेदी-विक्रीच्या नोंदी ठेवत नाहीत. त्यांच्याकडे भंगार साहित्य विकणार्‍यांचा किंवा त्यांच्याकडून भंगार साहित्य विकत घेऊन जाणाऱ्यांची ते माहिती ठेवत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घातपात होऊन जीवित आणि आर्थिक हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे परभणीच्या दहशतवादी विरोधी पथकाने अशा व्यवसायिकांविरुद्ध कारवाईची मोहीम छेडली आहे. ऑगस्ट महिन्यात परभणी शहरासह पाथरी आणि गंगाखेड तसेच पूर्णा येथील काही व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. डिटोनेटरच्या कांड्या देखील पकडण्यात आल्या होत्या. सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर दहशतवादी विरोधी पथक सतर्क झाले आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर परभणी शहरातील गुलशनाबाग येथील भंगार व्यवसायिक अमर चाऊस सोहेल चाऊस याच्या दुकानात पथकाने अचानक छापा टाकून पाहणी केली. त्यावेळी त्याच्याकडे खरेदी-विक्रीच्या कुठल्याही नोंदी आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती परभणीच्या दहशतवादविरोधी पथकाने दिले आहे.

Intro:परभणी - परभणीच्या 'एटीएस'ने अर्थात दहशतवादी विरोधी पथकाने शहरातील एका भंगार विक्रेत्याविरुद्ध कारवाई करत त्याच्यावर नवामोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दोन महिन्यात 'एटीएस'ने परभणीसह पाथरी, पूर्णा आणि गंगाखेड येथे भंगार व्यवसायिक, सायबर कॅफे, लॉजचालक, मोबाईलविक्रेते, प्रिंटर्स आणि स्फोटकांसंबंधी व्यवसाय करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली आहे.Body:दरम्यान, संबंधित व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायासंबंधी विस्तृत नोंदणी ठेवणे आवश्यक आहे. परंतु हे व्यवसायिक खरेदी-विक्रीच्या नोंदी ठेवत नाहीत. त्यांच्याकडे भंगार साहित्य विकणार्‍यांचा किंवा त्यांच्याकडून भंगार साहित्य विकत घेऊन जाणाऱ्यांची ते माहिती ठेवत नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात घातपात होऊन जीवित तसेच आर्थिक हानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे परभणीच्या दहशतवादी विरोधी पथकाने आशा व्यवसायिकांविरुद्ध कारवाईची मोहीम छेडली आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात परभणी शहरासह पाथरी आणि गंगाखेड तसेच पूर्णा येथील काही व्यावसायिकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच डिटोनेटरच्या कांड्या देखील पकडण्यात आल्या होत्या. सण-उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर दहशतवादी विरोधी पथक सतर्क झाले असून मोठ्या प्रमाणात कारवाई करून शांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. याच पार्श्वभूमीवर परभणी शहरातील गुलशनाबाग येथील भंगार व्यवसायिक अमर चाऊस सोहेल चाऊस याच्या दुकानात पथकाने अचानक छापा टाकून पाहणी केली. त्यावेळी त्याच्याकडे खरेदी-विक्रीच्या कुठल्याही नोंदी आढळून आल्या नाहीत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध नवा मोंढा पोलीस ठाण्यात कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती परभणीच्या दहशतवादविरोधी पथकाने दिले आहे.

- गिरीराज भगत, परभणी.
- सोबत :- pbn_ats_photo_17_sept_1 & 2 (कारवाई करण्यात आलेल्या दुकानाचे फोटो आहेत)
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.