परभणी - अडलेल्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 108 रुग्णवाहिकेच्या डॉक्टरांनीच बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे तातडीची रुग्णसेवा कोलमडली आहे. वेतनवाढ, रुग्णवाहिकेता होणारा गैरवापर आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारला आहे.
हेही वाचा - राज्यात आठ महिन्यात स्वाईन फ्लूचे 197 बळी, नाशिकमध्ये सर्वाधिक 33
परभणी जिल्हा रुग्णालयासह प्राथमिक रुग्णालयात 13 रुग्णवाहिका आहेत. यापैकी 11 रुग्णावाहिकेतील डॉक्टरांना वेतन वेळेवर मिळत नाही. कोणतेही कारण न देता या डॉक्टरांचे 15 ते 30 टक्के वेतन कपात करण्यात आली आहे. बीव्हीजी कंपनीमार्फत रुग्णवाहिकेतील डॉक्टर्स रूग्ण सेवा देत असतात. मात्र याच बीव्हीजी कंपनीकडून डॉक्टरांवर मोठा अन्याय केला जात असल्याचा आरोप हे डॉक्टर करत आहेत. विशेष म्हणजे रुग्णवाहिकेचे मेंटेनन्स केले जात नाही. त्यामुळे या डॉक्टर्सना मोठ्या अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
हेही वाचा - परभणीत संस्थाचालकांचा शिक्षक आंदोलनाला पाठिंबा, सुमारे 800 शाळा, महाविद्यालय ठेवली बंद
रुग्णवाहिकेसाठी जिल्हा व्यवस्थापकाची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, गेल्या महिन्यापासून जिल्हा व्यवस्थापक डॉ. सागर तातोड हे इतर ठिकाणी काम करत असल्याने रुग्णवाहिकेच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देत नाहीत. परिणामी, डॉक्टरांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच जिल्हा रुग्णालयातून गेल्या काही महिन्यांपासून रुग्णवाहिकेचा गैरवापर केला जात असल्याचे या संप पुकारलेल्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. स्त्री रुग्णालयातून दररोज 5 ते 7 रुग्ण रुग्णवाहिकेने नांदेड येथे रुग्णांना घेऊन जात आहेत. या व इतर अनेक गैरकारभाराविरोधात डॉक्टरांनी सोमवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. संपास बीव्हीजी कंपनी व जिल्हा व्यवस्थापक हेच जबाबदार असल्याचे या डॉक्टरांनी सांगितले आहे.
हेही वाचा - पोळ्याच्या दिवशी बिथरलेल्या बैलाने घेतला शेतकऱ्याचा जीव, परभणी जिल्ह्यातील घटना